Saturday, August 29, 2026
HomeBreaking Newsशिंदे शिवसेनेची नगराध्यक्ष पदाचा ‘पायल तोडसाम' ला प्रथम पसंती....

शिंदे शिवसेनेची नगराध्यक्ष पदाचा ‘पायल तोडसाम’ ला प्रथम पसंती….

•वणी नगरपरिषद निवडणुकीत धुरळा उडाला....

Ajay Kandewar, Wani : वणी नगरपरिषद निवडणुकीत विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात शिंदे शिवसेनेने नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून कुमारी पायल तोडसाम यांची घोषणा होताच राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. या उमेदवारीनंतर प्रभागनिहाय सुरू असलेल्या चर्चांमध्ये पायल तोडसाम यांनाच प्रथम पसंती मिळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.

शहरातील विविध भागात घेतल्या जात असलेल्या बैठका, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, युवकांचा वाढता सहभाग आणि शिंदे गटाची दमदार संघटनशक्ती यामुळे पायल तोडसाम या नावाभोवती जोरदार सकारात्मक लाट पाहायला मिळत आहे.स्थानिक प्रश्नांवर थेट भाष्य करत काम करण्याची क्षमता, पारदर्शक प्रशासनाची हमी, तसेच शिंदे गटाचे पूर्ण पाठबळ यामुळे पायल तोडसाम या नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक स्पर्धक आणि जनतेची आवडती निवड ठरत आहेत.

निवडणूक जाहीर झाल्यापासून शहरात दिसणारा उत्साह, रॅलींमध्ये उमटणारा जल्लोष, महिलांच्या गटांचा वाढता पाठिंबा आणि सामाजिक बांधिलकीवर आधारित त्यांचा कार्यभाव – या सर्व गोष्टींमुळे वणी नगरपरिषद निवडणुकीत ‘पायल लाट’ तीव्र होताना दिसत आहे.जनतेच्या अपेक्षांनुसार वणी शहराला नवीन दिशा देण्याची क्षमता असलेल्या कुमारी पायल तोडसाम यांच्याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.वणी नगरपरिषदेत या निवडणुकीत कोणत्या बाजूला धुरळा उडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, शिंदे शिवसेनेच्या या उमेदवारीमुळे निवडणुकीत मोठा उलटफेर होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page