Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsप्रभाग १ आणि ३ मध्ये शिंदे सेनेचे "विजय" शक्ती प्रदर्शन.....

प्रभाग १ आणि ३ मध्ये शिंदे सेनेचे “विजय” शक्ती प्रदर्शन…..

Ajay Kandewar, Wani :- नगर परिषद निवडणुकीचा काउंटडाऊन सुरू असताना प्रभाग १ आणि ३ मध्ये शिंदे सेनेचा प्रचार अक्षरशः बॅकफूटवर गेलेल्या विरोधकांना अस्वस्थ करत आहे. विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात निघालेल्या शक्ती प्रदर्शनाने संपूर्ण प्रभागात प्रचंड उत्साहाची लाट उसळली.

विजय चोरडिया यांनी मैदानात उतरताच वातावरणच बदलले आहे दरवाजोदर संपर्क, नेमके प्रश्न, आणि अचूक उत्तरांची मांडणी, यामुळे नागरिकांमध्ये स्पष्ट संदेश गेला की या वेळेस प्रभाग १ आणि ३ मध्ये लढत एकतर्फी होणार आहे.शिंदे सेनेच्या रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधकांचे डाव पेपरवरच राहिले. काहींनी तर आपल्या प्रचाराच्या बैठका तातडीने रद्द करून प्लॅन बदलण्याची धावपळ सुरू केली असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

शहरातील पाणी, रस्ते, ड्रेनेज, नागरी सोयी यावर थेट बोट ठेवत विजय चोरडिया यांनी मांडलेली विकासाची दिशा लोकांना भिडली. प्रभागातील सर्व विभागांत उत्साहाने उसळलेली जनसागर लाट पाहून शिंदे सेना प्रभाग १ आणि ३ मध्ये ‘विजय’ लिहून ठेवला असल्याचे वातावरण निर्मित झाले आहे.विरोधकांच्या गलथान कामगिरीवर आणि अपयशी आश्वासनांवर नागरिकांनी आता उघडपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली असून, या शक्ती प्रदर्शनाने निवडणुकीची हवा स्पष्टपणे शिंदे सेनेकडे वळल्याचे चित्र दिसू लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page