Monday, May 4, 2026
HomeBreakingपोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यूची शंका...!

पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यूची शंका…!

•शोध मोहीम सुरू,उद्या घटनास्थळी दाखल होणार NDRF पथक.

अजय कंडेवार,वणी:- पोहता येत असतानाही पाण्याचा अंदाज न आल्याने, तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. वणी तालुक्यातील नांदेपेरा वांजरी (खदान) येथील तलावासारखे मोठे गड्डे असलेल्या पाण्यात बुडून झाल्याची घटना दि.2 सप्टे.शनिवारी दुपारी पाच वाजताचा सुमारास आढळून आली.

शहरानजीक असलेल्या वांजरी(खदान) येथील पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यातील एकाही तरुणाचा मृतदेह रात्र होत पर्यंतही सापडला नसून बुडालेल्या युवकांचा शोध घेतला जात आहे. वणी शहरात राहणारे आसिफ शेख (वय अंदाजे 16) ,नुमान शेख(वय अंदाजे 15 वर्ष)हे दोन युवक एकता नगर येथील तर प्रतीक संजय मडावी हा प्रगती नगर येथील आहेत.हे तीनही तरुण नेहमी पोहण्यासाठी शहरानजीक असलेल्या वांजरी(खदान) येथे यायचे असे तेथील सूत्रांकडून माहिती मिळाली.त्या खदानीजवळ एक दुचाकी क्र.MH- 29 Y-5342 तसेच पॅन्ट शर्ट, तीन जोड चप्पला आणि मोबाईल नागरीकांना दिसताच नागरिकांनी आरडाओरडा सुरू केला. स्थानिक नागरिक व पोलीसांनी शोध घेतला असता एकही मृतदेह आढळून आला नाही  मात्र, बुडालेल्याचा शोध घेतला जात आहे.तर रात्र झाल्याने पोलिसांना काहीही थांगपत्ता लागत नसल्याने शोध उद्या घेण्यात येइल तसेच घटनास्थळी दाखल होणार NDRF पथक अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page