Wednesday, April 22, 2026
HomeUncategorizedदीड वर्षात विकास काय? कागदपत्रे सहित यादी दाखवा.....

दीड वर्षात विकास काय? कागदपत्रे सहित यादी दाखवा…..

Ajay Kandewar,Wani:- शहरातील नमो उद्यानाच्या तिसऱ्यांदा झालेल्या उद्घाटन सोहळ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विद्यमान आमदार संजय देरकर यांच्यावर थेट आणि तीव्र शब्दांत हल्ला चढवला. आपल्या भाषणात त्यांनी गेल्या १५ महिन्यांत वणी शहराच्या विकासासाठी नेमकं काय काम झालं, याची कागदोपत्री माहिती जनतेसमोर मांडावी, असे खुले आव्हान दिले.“दीड वर्ष गेले आता साडे तीन वर्ष” उरले दिवस विकासकामात जाईल की श्रेयवादात, असा गंभीर प्रश्न जनतेसमोर उपस्थित झाला.

माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “फक्त उद्घाटनांचे राजकारण करून विकास होत नाही. जनतेला सत्य माहिती मिळाली पाहिजे. त्यामुळे डिजिटल व प्रिंट मीडियाच्या पत्रकार बंधूंनी पुढाकार घेऊन विद्यमान व माजी आमदारांमध्ये “खुली डिबेट” आयोजित करावी, जेणेकरून खरी कागदपत्रे आणि वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचेल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये मोठी खळबळ उडाली.याचवेळी त्यांनी फलक पाडण्याच्या घटनेवरही संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, “उद्घाटनाचा फलक पाडणारा हा एखादा समाजकंटक असू शकतो किंवा मनोरुग्ण असावा. अशा प्रकारच्या शहरात घडलेली घटना लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या आहेत.” तसेच, “शिवसैनिक एकदा दिलेला शब्द कधीही परत घेत नाहीत, पण सध्या जे शहरात अनुभवायला मिळत आहे, ते पूर्णपणे वेगळे आहे,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

निव्वळ गर्दी गोळा करून नागरिकांची दिशाभूल करणे हाच सध्या प्रकार सुरू…

निव्वळ गर्दी गोळा करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार तात्काळ थांबवावा, असा अप्रत्यक्ष टोला माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विरोधकांना लगावला.जनतेसमोर खरा विकास आणि केलेल्या कामांची कागदोपत्री माहिती सादर करावी, अशी त्यांची मागणी होती.फक्त दिखावा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रेय लाटण्याचे राजकारण चालणार नाही,असे एका माध्यमातून ठणकावले.लोकांना चुकीची माहिती देणे हा लोकशाहीचा अपमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यापुढे पारदर्शक कारभार न झाल्यास जनतेसमोर सत्य मांडण्याचा इशाराही माजी आमदार यांनी   दिला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page