Thursday, July 9, 2026
HomeBreakingदहशत पसरविणाऱ्या 'अनिल जाधव' याला अटक.....

दहशत पसरविणाऱ्या ‘अनिल जाधव’ याला अटक…..

Wani:- घाटंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सराईत गुन्हेगाराला LCB पोलिसांचा चमूने अटक केली आहे. या सराईत इसमाचे नाव अनिल उत्तम जाधव (वय २९ वर्ष, रा. इंदिरा नगर बेघर घाटी, घाटंजी)असे आहे.LCB पथकाने त्याच्याकडून धारदार शस्त्र (2 तलवारी ) व चारचाकी वाहन स्विफ्ट डिझायर जप्त केली आहे.

माहितीनुसार सराईत इसम अनिल जाधव हा घातक धारदार तलवारी घेऊन खापरी नाका घाटंजी जवळील येळाबारा गावाकडे जाणाऱ्या रोडवर आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये गाडीच्या डिक्कीमध्ये एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक पोत्यात दोन अत्यंत धारदार लोखंडी तलवारी लपवून ठेवलेल्या आढळून आले. चौकशी केली असता, दोन तलवारीची किंमत २०००रु. व गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी वाहन कि.४,५०,००० असा मुद्देमाल जप्त केला.आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे घाटंजी येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये (Arms Act) गुन्हा दाखल करून त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले .

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात P.I सतीश चवरे, API दत्ता पेंडकर,सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, अमीत पोयाम, रजनीकांत मडावी, सतीश फुके यांनी केली

.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page