Friday, July 3, 2026
HomeBreaking"त्या" Viral हिंसक पोस्टवर वणी पोलिसांचा "रट्टा......

“त्या” Viral हिंसक पोस्टवर वणी पोलिसांचा “रट्टा……

Ajay,Wani : शहरात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह स्टेटसची गंभीर दखल घेत वणी पोलिसांनी तात्काळ कारवाईची चक्रे फिरवली. पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी पथक प्रमुख साजिद शेख यांनी तातडीने माहितीची पडताळणी करून संबंधित तरुणाचा शोध घेत अल्ताब गुलाम रसूल रंगरेज (रा. सुभाष चौक, वणी)(BNSS) कलम 126 व 135(3) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली.

सोशल मीडियावर टाकण्यात आलेला मजकूर “तुला इतका मारनार तुझा बाप पण म्हणला पाहीजे कशाला नादी लागला होता” त्याने  असे सोशल मीडियावर वर स्टेटस ठेवले तसेच आणखी “एक हिंसक असे चित्र” व त्यावर “307” असे लिहिलेल कॅप्शन ठेवल्यामुळे त्याचा या कृतीमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर वणी पोलिसांनी कोणताही विलंब न लावता संबंधित व्यक्ती अल्ताब गुलाम रसूल रंगरेज (रा. सुभाष चौक, वणी) ताब्यात घेऊन कायदेशीर कार्यवाही केली. प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत संबंधिताकडून शांतता भंग होणार नाही, अशा स्वरूपाचा 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीबंधाचा प्रस्तावही सादर करण्यात आल्याचे पत्रातून स्पष्ट होते. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्ताब रंगरेज हा वणी नगरपरिषद येथील उबाठा नगरसेवक रसूल रंगरेज यांचा “सुपुत्र” आहे त्यांच्या केलेल्या कृत्याने वणी शहरात वेगळीच खळबळ माजलेली आहे.

या संपूर्ण प्रकरणात वणी ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी तातडीने डीबी पथक प्रमुख साजिद खान सूचना देत त्वरित हालचाली करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून दिला गेला आहे.

कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारी पोस्ट पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे.- P.I भानुदास पिदूरकर.

या पार्श्वभूमीवर वणी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर आक्षेपार्ह, भडकाऊ किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारी पोस्ट आढळल्यास ती व्हायरल न करता तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणावी. अशा प्रत्येक प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page