Ajay Kandewar,Wani:-ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियुक्त असलेले राजूर मेडिकल ऑफिसर आणि कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची गंभीर चर्चा सध्या यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहे. शासनाकडून ग्रामीण नागरिकांना तातडीची आरोग्य सेवा मिळावी म्हणून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना राजूर गावात PHC ला कुलूप लावून घरी राहता सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र राजूर गावात दिसत आहे. रात्रीच्या वेळी PHC ओस पडत एक साध कर्मचारी सुद्धा राहत नसून रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यात कामचोर “फार्मसिस्ट महाशय, Nurse, डॉक्टर आणि संपूर्ण PHC ची जबाबदारी पेलणारे महाशय वाडी साहेब व इतर कर्मचारी “सकाळी उशिरा येतात तर संध्याकाळ होताच मुख्यालय सोडून निघून जातात. त्यामुळे रात्री आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे काही “मुजोर” कर्मचारी आणि मेडिकल ऑफिसर यांच्यावर वरिष्ठांचा आणि हरामखोर पांढरपोश्यांचा वरदहस्त असल्यानेच ते बिनधास्तपणे नियम मोडत असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.
क्रमशः…… भाग 6 आता मुजोर कर्मचारी रडारवर….


