Thursday, April 30, 2026
Homeक्राईमअश्लील अंगविक्षेप करणाऱ्या तिघांना अटक.....

अश्लील अंगविक्षेप करणाऱ्या तिघांना अटक…..

•डी.बी पथकाची कारवाई.

अजय कंडेवार,वणी : शहरातील डी.बी पथकाने आता कारवायांचा धडाका सुरू केला आहे त्यात प्रेमनगरातील काही महिला सार्वजनिक ठिकाणी अंगाचे जाणून बुजून प्रदर्शन करीत अश्लील अंगविक्षेप करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेत त्यांचावर 16 मार्च 2023 ला कारवाई करण्यात आले .Three arrested for obscenity

3 वेश्या व्यवसाय करणा-या महिला हया (रा. परभणी, मध्यप्रदेश आणि राजस्थान) परंतु त्या हल्ली मुक्काम प्रेमनगरात आहे. त्या तिन्ही महिला सार्वजनिक तेथील येऊन हातवारे इशारे करून अश्लीलरित्या सार्वजनिक ठिकाणी आपल्या अंगांचे जाणून बुजून प्रदर्शन मांडून अश्लील अंगविक्षेप करून वेश्या व्यवसायांचे प्रयोजना करीता प्रयत्न करीत असतांना मिळून आल्या त्यांचे विरूध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 7 व 8 कलम प्रमाणे कार्यवाही करून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही डॉ.पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ,पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उपविभागीय पोलिस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात प्रदिप शिरस्कर ( ठाणेदार पोलीस स्टेशन,वणी),प्रविण हिरे(पोउपनि) सुदर्शन वानोळे(सहायक फौजदार), सुहास मंदावार, रूपाली बदखल, प्रगती काकडे, पुरूषोत्तम डडमल यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page