अजय कंडेवार,वणी:- पोलीस स्टेशन वणी जि. यवतमाळ येथे दिनांक 29 में रोजी सुरेश मोतीलालजी खिवनसरा (वय ६३ वर्ष), व्यवसाय बिल्डींग मटेरियल सप्लायर्स ,रविनगर वणी ता.वणी जि.यवतमाळ यांचा मालकीचे योगेश ट्रेडर्स या नावाने सिमेंट, स्टिलचे गोडावूनमध्ये कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरी करण्याचे उद्देशाने येवुन लोखंडी सळाखीचे चार बंडल वजन अं.२४० किलो कि अं. १४०००/- रुपयांचा चोरून नेले व गोडावुनवर चौकीदार माणून काम करीत असलेले जिवन विठ्ठल झाडे वय अं.६० वर्ष रा. आष्टोणा ता. राळेगांव पो.स्टे. वडकी यास डोक्यावर व उजव्या खांद्यावर कुठल्यातरी हत्याराने जबर मारहाण करुन जिवानिशी ठार मारले अशा रिपोर्ट वरुन पो.स्टे. वणी येथे अपराध क्रमांक ४३२/२०२४ कलम ३०२,३९४ भादंवि प्रमाणे नोंद करून सदरचे प्रकरण तपासावर होतें.
या प्रकरणाचे घटनास्थळी अज्ञात आरोपीत ईसमांनी कोणताही पुरावा सोडला नव्हता, तसेच सदरचे घटनास्थळ हे रोड पासून अंतर १०० मिटर अंतरावर असून सभोवताली मोकळी जागा आहे. तसेच सदर परिसरात लावण्यात आलेले CCTV कैमरे हे बंद अवस्थेत असल्याने गुन्हयाचे तपासकामी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध झाला नही, तसेच गुन्हयाचे तपासा बाबत कोणतीही दिशा मिळून येत नव्हती. त्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. करीता पोलीस अधिक्षक यवतमाळ यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता दिशा निर्देश दिले होते, त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे हे स्वतः सदर प्रकरणाचे तपासात बारकाईने लक्ष देवून होते, तसेच ठाणेदार पो.स्टे. वणी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता विशेष पोलीसांचे एकुण ०५ पथक तयार केले होते. सदर पोलीस पथकांनी घटनास्थळ ते मारेगांव, नांदेपेरा रोड, मुकुटबन रोड, ग्राम पळसोनी तसेच वरोरा, घुग्गुस, शिरपुर, यवतमाळ या रोडवरील जवळपास १०० पेक्षा अधिक CCTV फुटेज प्राप्त करुन त्याची सविस्तर बारकाईने पाहणी केली असता काही CCTV फुटेज मध्ये घटनेवेळी एक मालवाहू वाहन संशयीतरित्या फिरत आढळून आले. व सदर वाहनातील व्यक्तीची हालचाल सुध्दा संशयास्पद असल्याचे दिसून आले, करीता मालवाहू वाहन हे नेमके कोणते आहे, कोणत्या ठिकाणा वरचे आहे याबाबत स्पष्ट माहिती समजून आली नाही, तसेच वाहनाचा क्रमांक सुध्दा स्पष्ट दिसून येत नव्हता. करीता प्राप्त CCTV फुटेजची पुनश्चः बारकाईने पाहणी करुन सदर वाहनाची फोटो कॉपी काढून नमूद संशयीत वाहनाचा शोध घेत असतांना दिनांक १४/०५/२०२४ रोजी सदरचे वाहन वणी परिसरामध्ये आढळून आले. नमूद वाहन व CCTV फुटेज मधील वाहनाचे मिळते जुळते असल्याने नमूद वाहनास ताब्यात घेवून पो.स्टे.ला आणण्यात आले, वाहनाची व CCTV फुटेजची बारकाईने पाहणी केली असता सदर गुन्हयातील वाहन हे तेच वाहन असल्याचे व ते टाटा कंपनीचे इन्ट्रा बाहन क्रमांक MH 37 T 2856. हे असल्याचे निष्पन्न झाले. करीता सदर वाहनावरील चालकास सविस्तर विचारपुस केली असता त्याने माहिती दिली की, घटनेवेळी इतर दुसरे व्यक्ती वणी परिसरामध्ये आले असावे तसेच सदरचे वाहन रज्जाक शाह रमजान शहा वय ४५ वर्ष रा. नूरनगर, कारंजा लाड जि. वाशीम याचे मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. करीता सदर प्रकरणाचे पुढील तपासकामी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे हे स्वतः पोलीस पथकासह कारंजा जि. वाशीम येथे रवाना झाले, सदर ठिकाणी सविस्तर तपास केला असता नमुद घटनेवेळी सदर वाहनावर बालक म्हणुन १) अनीस शहा रमजान शहा वय ३५ वर्ष रा.नुरनगर, कलंदरी मस्जीद जवळ, कारंजा लाड ता. कारंजा जि. वाशीम, तसेच मदतनीस २) मोहमद उमर अब्दुल गणी वय ३६ वर्ष रा. वेबी सातपुरा, गुना सरकारी दवाखाना जवळ कारंजा लाड ता. कारंजा जि. वाशीम तसेच ३) एक अल्पवयीन बालक हे वणी परिसरात सदरचे वाहन घेवून आल्याचे निष्पन्न झाले. करीता नमूद तिन्ही ईसमांना उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे हे अधिनस्त पथकाने नमुद दोन्ही इसम व अल्पवयीन बालकास ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्हयाचे अनुषंगाने सविस्तर विचारपुस केली असता, त्यांनी कबुल दिली की, आरोपी अनीस शहा रमजान शहा पभंगार व जुने टायर खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय असल्याने ते दिनांक २८/०४/२०२४ रोजी नमुद साथीदारांसह वणी मध्ये आले होते. त्यांनी पडसोनी फाट्यावरील गोडावूनची सविस्तर पाहणी केली तेव्हा त्यांना सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोखंडी सळाख ठेवून असल्याचे व त्या ठिकाणी एकाच वृध्द इसम चौकीदार असल्याचे दिसुन आले. करीता त्यांनी पाहणी करुन लालपुलीया परिसरात गेले, सदर ठिकाणा वरुन त्यांनी रोडवरील दुकाना समोरुन जुन्या टावरची चोरी केली व परत सदरच्या घटनास्थळी आले व तिथे येवून त्यांनी लोखंडो सठाखची चोरी केली व त्या दरम्यान सदर ठिकाणावरील चौकीदार बाला आरोपीत इसम हे चोरी करीत असल्याचे दिसून आल्याने व चौकीदारांनी त्यांना विरोध दर्शविल्याने नमुद आरोपीतांनी चौकीदाराचे डोक्यावर व बरगडीवर लोखंडी रॉडने वार करुन जागीच ठार केले. व घटनास्थळावरुन पळून गेले. असे सदर प्रकरणाचे तपासात निष्पन्न झाले असल्याने व नमूद आरोपीतांनीच संगनमत करुन गुन्हा केल्याचे सिध्द झाले व सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी, पोलीस स्टेशन वणी हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पवन बनसोड पोलीस अधिक्षक यवतमाळ, पोलीस उपअधिक्षक यवतमाळ पियुष जगताप यांचा मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश किंद्रे , वणी ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी,API दत्ता पेंडकर,PSI बलराम झाडोकार, PSI धिरज गुल्हाणे, सुदाम आसोरे, अश्विनी रायबोले, सुहास मंदावार, विकास धडसे, विजय वानखडे, पोना पंकज उंबरकर, अमोल अन्नेरवार, अविनाश बानकर,शाम राठोड, विशाल गेडाम, मो. वसीम, रितेश भोयर व अमोल नुन्नेलवार यांनी केली आहे.