Ajay Kandewar | Wani : वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहदा गावात चोरट्यांनी आता ‘सीमा’च ओलांडली! मृतांचे अंतिम संस्कार होणाऱ्या स्मशानभूमीतूनच लोखंडी गेट आणि बीड धातूचे कठडे चोरट्यांनी लंपास केले आहेत.
मृतदेह दहनासाठी उभारलेले ‘बर्निंग रॅक’ आणि लोखंडी पोल गायब झाल्याचे उघड होताच ग्रामस्थ अक्षरशः संतप्त झाले आहेत. मंदिर, घर, दुकान यातील चोरीचे प्रकार नवीन नाहीत, पण आता स्मशानभूमीही चोरट्यांच्या हातून सुरक्षित नाही, ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ग्रामस्थांचा संताप ओसंडून वाहत आहे. “जिथे जीव संपतो, तिथेही लोखंड संपलं! अशी ग्रामस्थांची तीव्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली आहे.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

