अजय कंडेवार,वणी :- पतंजलि योग परिवार आणि संपूर्ण योग साधक वणी,जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान,गणेशपुर रोड वणी(एस.पी.एम. शाळेच्या बाजुला) ११ में ते १३ में पर्यंत (शनिवार, रविवार व सोमवार) तीन दिवसीय मोफत इंटिग्रेटेड योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.”Three Days” Free Yoga Camp in Wani.
वणीत ११ में पासून सुरू होणारे हे शिबिर १३ में पर्यंत चालेल. मुख्यतः महिला पतंजली योग समितीच्या मुख्य केंद्रीय साध्वी देवप्रिया यांचे वणी शहरात आगमन होणार आहे. ११ में रोजी पहाटे ५ ते ७.०० या वेळेत भव्य असे त्यांचे शिबिर संपन्न होईल.या शिबीरात राज्य प्रभारी महिला पतंजलि योग समिती महाराष्ट्र संजिवनी माने (योगरत्न पुरस्कार प्राप्त ),राज्य कार्यकारिणी सदस्या , महिला पतंजलि योग समिती महाराष्ट्र माया चव्हाण ( उत्कृष्ट राज्य कार्यकारिणी पुरस्कार प्राप्त ) यांचेही प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
या शिबिरात आधुनिक समग्र योग साधनेद्वारे नागरिकांच्या विविध व्याधीवर योग व आयुर्वेद नैसर्गिक उपचार पद्धतीद्वारा निरोगी कसे राहता येईल, तसेच यज्ञ, मंत्र, पंचकर्म, पटकर्म, योगासने, प्राणायाम, ध्यानधारणे द्वारा सूक्ष्म व्यायाम चिकित्साद्वारे शरीरातील विषयुक्त घटक बाहेर काढून दीर्घ आरोग्य कसे मिळवता येईल व ताणतणावरहित जीवन कसे जगता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे शिबिर सर्वांसाठी (खुले )असून शहरातील विविध परिसरातील व्याधीग्रस्त नागरिकांना मानसिक शारीरिकदृष्ट्या लाभदायक ठरते. या शिबिराचा लाभ परिसरातील जनेतेने घ्यावा, असे आवाहन “छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गुड मॉर्निंग ग्रुप”ने यांनी केले.