अजय कंडेवार,Wani:- राज्यासह देशभरात मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्याने समाज मन हादरुन गेले आहे. बदलापूर येथील घटनेने तर कृरतेचा कळसच गाठला आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी वणी पोलिस स्टेशनच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनींना ‘गुड टच, बॅड टच’विषयी मार्गदर्शन करण्यात येत असून, वणी तालुक्यातील लोकमान्य टिळक या महाविद्यालयात विद्यार्थिनींना (ता.31) रोजी पोलिस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी मार्गदर्शन केले. Public awareness on behalf of Wani Police Station and Thanedar Anil Behrani interacted with the students.
वणी येथील लो. टी. महाविद्यालय माध्यमिक विद्यालयात (ता.31 )शनिवार रोजी महाविद्यालयातील सभागृह भवनात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात वणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी विद्यार्थिनींना ‘गुड टच, बॅड टच’ व समाजात घडणाऱ्या विविध घटनांबद्दल माहिती देऊन सतर्क केले. तसेच निर्भया, दामिनी पथक ,मुलींना सुरक्षेबाबत ,वाढती गुन्हेगारी, मुलीवर होणारे अत्याचार ,कायद्यात झालेले बदल , वाहतुक नियमन ,सोशल मीडियाचा वापर ,गुड टच बॅड टच व सायबर सेक्युरिटी याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.तरुण युवक व युवतींची फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून कशाप्रकारे फसवणूक होते याबद्दलही माहिती देऊन काय उपाययोजना कराव्यात याविषयी सांगितले. मुलींनी आत्मसुरक्षा करून स्वतःचा बचाव कसा करता येईल तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात वेळेचा सदुपयोग करून घेण्याचे आवाहन केले आहे.पोलिस दादांनी विद्यार्थिनिंशी संवाद साधून तुमच्या काही तक्रारी आहेत का, याबाबत विचारपूस करून त्यांचे मत जाणून घेतले. विद्यार्थ्यांनी देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिला. यावेळी शेकडो विद्यार्थिनी,विद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
•टपोरींचा बंदोबस्त करणार…..
“शाळा, कॉलेज, क्लासेस तसेच बसस्थानक परिसरात टपोरी करणार्यांचा राबता कायम असतो. यासाठी पोलिसांनी बीट मार्शल, पीसीआर व्हॅनद्वारे अशा टपोरीगिरांवर वॉच ठेवून त्यांना धडा शिकविले जाईल. मुलींनी तक्रार केली की, तत्काळ त्याची दखल घेवून शहानिशा करत कायदेशीर कठोर कारवाई करणार आहोत.यासाठी टवाळखोर मुलांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्या समक्ष समज दिली जाईल.”- ठाणेदा वणी पोलिस स्टेशन,ठाणेदार अनिल बेहेरानी