अजय कंडेवार,Wani:– महाविकास आघाडीचें अधिकृत उमेदवार संजय नीलकंठ देरकर हे वणी विधानसभा निर्वाचन क्षेत्रासाठी आज २९ ऑक्टोबर मंगळवार रोजी उमेदवारी दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे या त्यांची या मतदार संघात छबीही चांगली असल्याने त्यांना नेहमी जनतेचा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे त्यांचं मनोबल उच्च शिखरावर आहे.
यंदाची वणी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक चुरशीची दाखल असली तरी कामाचा अनुभव व जनाधार लक्षात घेता आणि विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचे शिवसेनेत प्रवेश झाल्याने त्यांचा विजयाचा मार्ग ही सुकर झाल्याचे जाणवत आहे. वणी विधानसभेत यंदाच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी नामांकन दाखल केले असले तरी , शक्ती प्रदर्शनात स्पर्धा दिसून येत आहे. मात्र नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या तारखेला म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीचा घटक पक्ष शिवसेना उबाठा चे अधिकृत उमेदवार संजय देरकर हे नामांकन दाखल करीत असून उमेदवारी दाखल करताना फार मोठे शक्तिप्रदर्शन राहणार असल्याचे बोलले जात आहे.शक्ती प्रदर्शन रॅली मार्ग सुरुवात जत्रा मैदान-शर्मा चौपाटी-गाडगेबाबा चौक २-टागोर चौक-टिळक चौक व समारंभ पाणी टाकी येथे होणार आहे.
विशेष व उल्लेखनीय वणी विधानसभा म्हणजे निर्वाचन क्षेत्रात जनसंवाद व आढावा बैठकीच्या माध्यमातून जनसंपर्क करण्यात संजय देरकर अव्वल ठरत आहे त्यामुळे त्यांची बाजू मजबूत व भक्कम मानली जात आहे. मंगळवार 29 सप्टेंबर रोजी वणी येथून उमेदवार दाखल करणार असल्याने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडी तर्फे करण्यात आले आहे.