•पोलिस ठाण्यातर्फे इफ्तार पार्टी.
अजय कंडेवार,वणी :- वणी मधील इफ्तार पार्टी हिंदू आणि मुस्लीम (Hindu Muslim) यांच्या ऐक्यातून सर्वधर्मसमभावाची ही परंपरा आदर्श ठरणारी आहे. कारण 21 व्या शतकात तंत्रज्ञानाने प्रगती केली असली तरी धर्मांध राजकारण करणाऱ्यांत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली.अशा परिस्थितीत मुस्लिम उत्सवाच्या रमजान (Ramzan Festival) महिन्यात इफ्तार पार्टीला (Iftar Party) उपस्थित हिंदू -मुस्लिम व्यक्ती अशी परंपरा वणी मध्ये पि.आय शिरस्कर यांचा काळात सामाजिक ऐक्य पाहायला मिळाली. हे तेव्हढेच सत्य.. Shiraskar cultivates social unity..Iftar Party by Police Station.
बुधवार दिनांक 19 एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन वणी पोलीस स्टेशनतर्फे शेतकरी मंदिर येथे करण्यात आले तसेच वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार (Sanjeev Reddy Bodkurwar) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षीय भाषणातून आमदार बोदकुरवार यांनी “वणी हे सर्वपक्षीय तसेच सांस्कृतीक शहर आहे “असे मनोगत व्यक्त केले तर प्रमुख पाहूणे म्हणून यवतमाळ पोलीस अधिक्षक डॉ. पवन बंसोड यांनी “पोलीस प्रशासन सण उत्सवासाठी कटिबध्द आहे . असे त्यांनी मनोगत व्यक्त केलें .
इफ्तार पार्टीचा तो क्षण….
यावेळी मंचावर उपस्थित अध्यक्षस्थानी वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.पवन बंसोड (यवतमाळ पोलीस अधिक्षक)उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार,राजु उंबरकर (नेते, मनसे),आशिष खुलसंगे(अध्यक्ष द वसंत जिनिंग,वणी), विनोद मोहितकर(शिंदे गट शिवसेना, विभाग प्रमुख), संजय देरकर यांच्यासह शहरातील विविध समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पदाधिकारी, मुस्लिम समाजाचे मौलाना व आठही मस्जिद कमिटीचे अध्यक्ष, पदाधिकारी, पत्रकार व व्यापारी बांधव उपस्थित होते.
वणी पोलीस स्टेशनच्या सदर उपक्रमामुळे सर्वधर्मीय व सर्वपक्षीय मान्यवरांनी एकत्रितपणे फराळ करून रोजा इफ्तार केला. यावेळी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे अभिनव दर्शन घडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपनीय शाखेचे शेखर वांढरे, ज्ञानेश्वर आत्राम आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.