Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील मुकुटबन परिसरात मनसे नेते राजू उंबरकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. RCCPL कंपनीचे सहायक उपाध्यक्ष दिलीप मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधितांनी कंपनीच्या प्लांटमध्ये जबरदस्ती घुसून धमकावणे तसेच त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुटबन पोलिसांनी या प्रकरणी राजू उंबरकर, फाल्गुन गोहकार व आणखी एका व्यक्तीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 329(3), 351(2), 3(5), 3(1) नुसार कारवाई सुरू केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधितानी कंपनीच्या परिसरात प्रवेश करून स्थानिकांना कामावर का ठेवले नाही आणि सेक्युरिटी विभागातील एकाला फायर विभागात का काम दिले देत नाही, या कारणावरून मनसे नेते यांनी RCCPL कंपनीत घुसून अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप बयानात नमूद आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

