Tuesday, October 14, 2025
Homeमारेगाववणी विधानसभेत "प्रतिभाताई" करीता "४० ते ५०"गावात सभा....

वणी विधानसभेत “प्रतिभाताई” करीता “४० ते ५०”गावात सभा….

•"संजय खाडे" यांचा प्रचाराने मतदारात विश्वास निर्मिती वातावरण.

Wani Constituency अजय कंडेवार,वणी:- वणी विधानसभेतील इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते विविध भागात सध्या प्रचार करीत आहे. यातील संजय खाडे आणि सहकारी यांची एक टीम आहे. ही टीम सध्या प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ झंझावात गावखेड्यात सकाळपासून सुरु झालेला हा प्रचार रात्री उशिरा पर्यंत सुरु आहे.Meeting in “40 to 50” villages for “pratibhatai” in Wani Vidhan Sabha.

काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रचारासाठी वणी विधानसभेत कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेसचे ॲक्टिव नेते संजय खाडे व त्यांचे सहकारी हे अहोरात्र प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ वणी विधानसभा क्षेत्रात मतदारांशी गाठभेट करीत जवळपास ४० ते ५० गावात जाऊन कॉर्नर सभा व प्रत्यक्ष गृहभेटी देत आहे. त्यांचा बैठक व सभेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहेत.

ताईंचा प्रचारासाठी खाडे सहकारी प्रा. शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, उत्तम गेडाम, अनिल भोयर, जितेंद्र बोंडे, संजय निखाडे यांच्यासह गावातील काँग्रेस, इंडिया आघाडीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या टीमसह इतर टीमचाही जोमात सुरुआहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments