Saturday, May 9, 2026
HomeमुकुटबनL.C.B ने धान्य चोरीचा गुन्हा केला उघड ...

L.C.B ने धान्य चोरीचा गुन्हा केला उघड …

•एकुण ५ लाख ३०, हजार रुपयाचा मुददेमाल जप्त

अजय कंडेवार,वणी :- पो.स्टे. मुकुटबन येथील धान्य चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विभागीय कार्यालय वणीचा टीमने उघडकीसआणून आरोपीला अटक करीत दुकानातुन चना व पिकअप असा एकुण ५लाख ३० हजार रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक ०४/०१/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विभागीय कार्यालय वणी येथे  शेख अकील शेख रसुल (वय ५० )यास त्याचे राहते घरुन ताब्यात घेतले व धान्य चोरीबाबत विचारपुस केली. त्याने अंदाजे ७ ते ८ महीन्यापुर्वी खडकडोह येथील अनोळख 3 व्यक्तीसोबत मिळुन हिवरपट्टा शेत शिवारातुन चना चोरी  केला होता व तो माल घेऊन पिक-अप गाडीने वणी येथील एका धान्य दुकानात विकला अशी स्पष्ट कबुली दिली होती.त्याबाबत पोस्टे मुकुटबन येथील गुन्हे अभिलेख तपासला असता दिनांक १२/०४/२०२२ रोजी हिवरपट्टा शिवारातुन ३ क्विटल चना चोरी गेल्याबाबत  कलम ४६१,३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद असल्याने यातील आरोपीस सोबत घेवुन त्याने ज्या धान्य दुकानात चोरीचा चना विकला होता. त्या दुकानातुन चोरीस गेलेला ०३ क्विटल चना किंमत ३०,००० रुपये व चोरीचे धान्य नेण्याकरीता वापरलेले मालवाहू पिकअप वाहन किंमत ५,००,००० रुपये असा एकुण ५,३०,००० रुपयाचा मुददेमाल जप्त करुन आरोपीसह पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन मुकुटबन यांचे ताब्यात दिला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप,प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल कडु, पोहवा/ उल्हास कुरकुटे, पोना/ सुधीर पांडे, महेश नाईक, सुधीर पिदुरकर, चापोहवा/ सतिश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page