Tuesday, February 17, 2026
HomeBreakingBreaking.....वणी राष्ट्रवादीची ‘तुतारी’ कोलमडली...

Breaking…..वणी राष्ट्रवादीची ‘तुतारी’ कोलमडली…

•विजय नगराळेंचा स्फोटक राजीनामा. •पक्षांतर्गत खदखद चव्हाट्यावर.

Ajay kandewar,Wani :- तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मध्ये निवडणुकीआधीच मोठी फूट प्रकर्षाने समोर आली आहे.पक्षाच्या अधिकृत लेटरहेडवरून दिलेल्या पत्राद्वारे एका पदाधिकाऱ्याने थेट राजीनामा जाहीर करत थेट नाराजी व्यक्त केली आहे.राजीनाम्याबद्दल माहिती घेतली असता ,पक्षातील चालू कार्यपद्धती,अंतर्गत तणाव व पदाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या सहकाराचा अभाव या कारणांमुळे त्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा तोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, हा राजीनामा कोणी साधा कार्यकर्ता नसून विजय नगराळे हे पक्षातील प्रत्येक जबाबदारी सांभाळणारे, अनुभवी, अनेक वर्षे राष्ट्रवादीसाठी खंबीरपणे उभे असलेले नेतृत्व. पक्षातील संघर्षाच्या काळातही पवार गटासाठी पहिल्या रांगेत लढणाऱ्या नगराडेंचा राजीनामा हा स्थानिक समीकरणे उलथवणारा धक्का मानला जात आहे.“वर्षानुवर्षे पक्षाशी निष्ठा जपणारा असा प्रमुख पदाधिकारी निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देतो याचे अर्थ फार गंभीर आहेत,अशी चर्चा सध्या परिसरात जोरात सुरू आहे.विजय नगराळे हे स्थानिक पातळीवर केवळ पदाधिकारी नव्हते, तर पक्ष टिकवणारे आणि अनेक कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवणारे नेतृत्व होते. अशा खंबीर चेहऱ्याने पक्ष सोडणे म्हणजे अंतर्गत अस्थिरतेचे संकेत अधिक तीव्र झाले असेच मानले जात आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments