Wednesday, April 15, 2026
Homeमुकुटबन"ई-पीक पाहणी" कराल तरच मिळणार "पीकविमा"...!

“ई-पीक पाहणी” कराल तरच मिळणार “पीकविमा”…!

अजय कंडेवार,वणी :- नैसर्गिक आपत्ती व पीकविमा भरपाई यात महत्त्वाच्या असणाऱ्या ई-पीक पाहणीत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा कारण खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर असून वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन तहसीलदार निखिल धुळधर व तालुका प्रशासन यांनी केले आहे.

खरीप हंगाम 2023 ची ई-पीक पाहणी पूर्ण केल्यामुळे शासनाच्या विविध योजना, पिक विमा, पिक कर्ज शासकीय अनुदान ई. विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार असल्याने सर्व शेतक-यांनी १०० टक्के ई-पीक पाणी पुर्ण करावी असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.वणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७१ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे सर्व शेतकरी यांना शक्य झाले आहे तेव्हा पीक पाहणी मोबाईलच्या सहाय्याने करून घ्यावी.खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी 1 जुलै 2023 पासून सुरु झालेली असून सदर नोंदणीकरिता दिनांक 15 ऑक्टो. 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

कोड…..

शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी गरजेची आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीतच पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन तहसीलदार निखिल धुळधर यांनी केले आहे. “

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page