Saturday, May 30, 2026
HomeBreaking Newsसायखेड्यात मटकापट्टी जोमात ... तिर्री, छगण, नागो, मेंढीची गुंज....

सायखेड्यात मटकापट्टी जोमात … तिर्री, छगण, नागो, मेंढीची गुंज….

•मटकाचालकाला आशीर्वाद कुणाचा ?

•पोलीसांचा नाकावर टिच्चून पट्टी सूरु, महिलांना नाहक त्रास

यवतमाळ :  अवैध व्यवसाय पुन्हा जोर पकडायला लागला आहे. पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ असेपर्यंत अवैध व्यावसायिकांवर वचक होता. पण त्यांची बदली होताच पुन्हा अवैध व्यावसायिकांनी आपले डोके वर काढावयास सुरवात केली आहे. इतकच काय तर चक्क सायखेळा गावात तर रस्त्यावरच मटका चालतो.आतापर्यंत अवैध व्यावसायिकां विरुद्ध कारवाई पोलीस पथकाचीही धार बोचट झाली आहे.

सायखेळा येथे मटका खुलेआम चालत असल्याने या अवैध मटका चालवणार्‍याला कारणीभुत कोण ? अस प्रश्न कष्ठकरी महिला वर्गातुन होत आहे.संबधीत पोलिसाकडून काही ठराविक मटका घेणार्‍या नौकरावर तात्पुरती कारवाई करुन पोलिस प्रशासन मोकळे होत असल्याने गब्बर मटका किंग कारवाई पासून दुरच राहत असल्याने पोलिस प्रशासनावर शंका व्यक्त केली जात आहे.गेल्या कित्येक दिवसांपासून सायखेळा गावात आणि परीसरात मटका चालत असुन यावर लगाम लाण्यास असमर्थ असलेल्या पोलिस ठाण्यामुळेच मटका जुगार फोपावला असल्याचीही ओरड आहे.

गावातील तसेच परिसरातील गाव – वस्तीतील गरीब कष्ठकरी महिला मजुर शेतात राब राब राबवून आलेला पैसा बाजारासाठी तसेच घरउपयोगी लागणार्‍या साहित्यासाठी जमा करत आपले कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी कष्ठाने कमवलेली तूटपुंजी हे जमा करुण ठेवतात परंतु नशेच्या आहारी गेला नवरा मटका व जुगार खेळण्यासाठी ऐण मजुरी मिळण्याच्या वेळी घरी येऊन पत्नीला मारहाण करून आलेली मजुरी पुर्ण घेऊन मटका खेळण्यासाठी थाटण्यात आलेल्या मटका काॅऊन्टरवर जावून मटक्याची आकडेवारी करीत मटका लावतात. व शेवटी पैसा संपला कि मद्यपान पिऊन घरी जाऊन घरातील बालकासह आपल्या पत्नीला मारहाण करतात.ह्या घडत असलेल्या प्रकाराकडे आळा घालणे गरजेचे झाले आहे.
सायखेळा बाजार येथे मटका घेणार्‍याचे दिवसन दिवस प्रमाण वाढतच चालले असल्यामुळे अनेक घरे उध्दस्त झाली असून अनेकांनी कर्जा पोटी अत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे.राजरोश घेण्यात येत असलेला मटका बंद न झाल्यास गरीब कुटुंबातील महिला वैतागुन घरसोडुन जाण्याच्या मानसीकतेत आहे. सायखेळा येथील शाळकरी विध्यार्थी,नवतरुण मंडळी हे व्यसनात अमाप पैसा खर्च करत असून सार्वजनिक असलेल्या ठिकाणी मौज मजा मारत असल्याने सज्जनाचे जगने हराम होवून दुर्जनांची दिवाळी व सुड प्रवूत्तीची होळी अशी दुरावस्था पहावयास मिळत आहे.म्हणुनच गाव मटकामुक्त करण्यासाठी व अवैध धंदे गावातून हाकलून लावल्या गेले तरच गावासह व संपूर्ण तालुक्यातिल गावे अवैध धंद्या पासुन मुक्त होऊ शकते. याकडे पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांनी सुध्दा जातीने लक्ष देवून दखल घेणे गरजेचे असल्याचे जाणकार नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page