Friday, April 17, 2026
Homeवणीमोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणारी टोळी गजाआड....

मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणारी टोळी गजाआड….

•शिरपूर पोलिसांची दमदार सिनेस्टाईल कारवाई..

अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कायर शिवारात रात्रीच्या सुमारास कायर येथील ईन्डस कंपनीचे आयडीया व जिओ सव्र्व्हस प्रोव्हाइंडर मोबाईल टॉवरच्या मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणारी टोळी बॅटऱ्यांची चोरी करीत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी शिरपूर पोलीस यांना माहिती दिली. लगेच क्षणाचा विलंब न लावता शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड यांनी ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून विचारपूस केली असता, त्यांना संपूर्ण माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी सर्वत्र नाकाबंदी करुन रात्री ताफ्यासह त्या चोरट्यांचा गाडीचा पाठलाग केला असता, त्यांना पिकअप पांढ-या रंगाची गाडी क्रमांक MH-24 AV-24- 2000 वाहन दिसुन आले.त्या सदर वाहनाचा पाठलाग करुन वाहनास पकडले असता डाल्यामध्ये इन्डस टॉवर कायर येथुन चोरी गेलेल्या अमायराराजा व एच. बी. एल कंपनीच्या 24 बॅट-या त्यांची प्रती बॅटरी किमत 7000/- रुपये प्रमाणे एकून 1 लाख 67 हजार रुपये किमतीच्या बॅट-या मिळाले .

सविस्तर वृत्त असे की, शिरपुर पोलीस स्टेशन हददीतील ग्राम कायर येथून दिनांक 25 डिसेंबर ला रात्री 12.30 वाजता माहिती मिळाली असता कायर येथील ईन्डस कंपनीचे आयडीया व जिओ सव्र्व्हस प्रोव्हाइंडर मोबाईल टॉवरच्या वॉट-या चोरी करीत आहे. अशी माहिती मिळाल्याने सहायक पोलीस निरीक्षक गजानन करवाड यांचा ताफा कायर येथील इंन्डस कंपनीचे मोबाईल टॉवर जवळ जावून विचारपुस करता तेथील टॉवर मेन्टनन्स करनारे व्यक्तीनी माहिती दिली असता काही आरोपी बाँट-या चोरी करून पिकअप वाहनातून गेले आहेत अशी माहिती मिळाल्याने तात्काळ सदर रोडने शासकीय वाहनाने पेट्रोलींग करुन तसेच व रोडवर नाकाबंदी करून अशोक लेलॉन्ड कंपनीचे पिकप पांढ-या रंगाची गाडी क्रमांक एम एच २४ एव्ही २००० वाहन दिसुन आले सदर वाहनाचा पाठलाग करुन वाहनास पकडले असता सदर वाहनाचं डाल्यामध्ये इन्डस टॉवर कायर येथुन चोरी गेलेल्या अमायराराजा व एच. बी. एल कंपनीच्या २४ बॅट-या प्रती बॅटरी किमत ७०००/- रुपय प्रमाणे एकून १ लाख ६७ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या मिळून आलेल्या वाहनातील आरोपी १) मोहम्मद शाहीर मोहम्मद दाउद शेख वय ३८ वर्ष २) महोम्मद युनुस रहीमोददीन शेख वय ३० वर्ष दोन्ही रा. डॉ राजेन्द्र प्रसाद बाँड बल्लारशा जिल्हा चंद्रपूर ३)शेख आसीफ शेख सुबान वय २२ वर्ष रा. मोलाना आझाद बोर्ड बल्लारशा ता. बल्लारशा जिल्हा चंद्रपूर यांना ताब्यात घेवून त्यांचे कडे गुन्हयाचे अनुशंगाने सखोल तपास केला असता त्यांनी चोरी केल्याच निष्पन्न झाल्याने त्यांचावर कलम ३७९.३४ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड ,अपर पोलीस अधीक्षकपियुष जगताप साहेब , उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, ठाणेदार पोलीस स्टेशन शिरपुर, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर काडुरे, विलास जाधव, अभीजीत कोषटवार, घोडाम,गजानन सावसाकडे व राजन ईसनकर यांनी केली आहे.

शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड यांचे  नागरिकांना विशेष आवाहन….

“नागरीकांना याव्दारे सूचीत करण्यात येते की, त्यांना कोणतीही अनुचित घटना निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क करावा अथवा डायल ११२ वर कॉल करावा.”

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page