Thursday, April 30, 2026
Homeवणीअतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवरच हल्ला...!

अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवरच हल्ला…!

•भ्याड हल्याचा निषेधार्थ वणी येथे कामबंद आंदोलन

अजय कंडेवार,वणी :- पुसद येथे अतिक्रमण मोहीम अंतर्गत पुसद नगर परिषदेचे मुख्याधिकारी व अतिक्रमण पथकावर झालेल्या भ्याड हल्याचे निषेधार्थ वणी येथे कामबंद आंदोलन करण्यात आले. त्याकरिता दोषींवर त्वरीत कारवाई व्हावी याकरीता समस्त नगरपरिषद वणी
वणी नगर परिषद कर्मचारी संघटनेचा वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता पुसद नगर परिषदेचे नियमीत अतिक्रमण मोहिमे अंतर्गत आंबेडकर चौक ते गांधी चौकातील अतिक्रमण काढण्याकरीता गेलेल्या अतिक्रमण पथकावर व मा. मुख्याधिकारी यांचेवर अतिक्रमण धारकांनी भ्याड हल्ला केला. त्यामुळे भ्याड हल्ला करणा-या आरोपींना जो पर्यंत अटक होत नाही तो पर्यंत वणी नगर परिषद जिल्हा यवतमाळ यांचे अधिनस्त सर्व कार्यालयीन कामकाज बंद करण्यात आले आहे .तरी दोषींवर त्वरीत कारवाई व्हावी याकरीता समस्त कर्मचारी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, यवतमाळ प्रशासक, नगर परिषद, वणी,उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद,मुख्याधिकारी, नगर परिषद, वणी , पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, वणी यांना पाठविण्यात आले आहे .

यावेळी उपस्थित यावेळी उपस्थित माधव सिडाम, इझहार शेख, विजय महाकुलकार, शांतनू साहेब, धम्म रत्न पाटील, महेश पारखी, राजेंद्र जयस्वाल, संजय पवार, सुभाष नरपांडे, मारोती मडकाम, इसाक रसिक, संजय दखणे, देविदास जाधव, भीमलेश्वर ताराचंद होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page