Sunday, May 10, 2026
Homeवणीपारंपरिक खेळांमध्ये रमली चिमुकली मुलं.....!

पारंपरिक खेळांमध्ये रमली चिमुकली मुलं…..!

• मॅकरून शाळेत बालक दिनानिमित्त स्तुत्यमय उपक्रम

अजय कंडेवार, वणी:- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ग्रूपचे मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी वणी येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापिका शोभना मॅडम होत्या. तसेच समस्त शिक्षकवृंद हे देखील उपस्थित होते.

विशेष म्हणजे मॅकरून शाळेने बाल दिवस हा आगळा वेगळा साजरा केला त्यात काही शंका नाहीं . आधुनिक युगात विद्यार्थी हा अनेक पाऊले पुढे गेलेला आपणास त्याची जाणीव आहे. परंतु यातूनही मॅकरून शाळेचा मुख्याध्यापक शोभना यांचा मार्गदर्शनाखाली लुप्त गुणांना वाव व पारंपारिक खेळाचा मनोसक्त आनंद घेता यावा याकरिता बाल दिनी एक सुंदर उपक्रम राबविला आहे.

मुलं विसरत चाललेल्या पारंपरिक खेळांनी मॅकरून शाळेतील विद्यार्थ्यांचे बालक दिनानिमित्त चांगलेच मनोरंजन झाले.. विटी-दांडू, लंगडी, मामाचं पत्र, लगोरी यासारख्या खेळांमध्ये ते समस्त विद्यार्थी रमले.
आताच्या आधुनिक युगात पारंपरिक खेळ जणू लोक विसरत चालले आहे व मुलांच्या हातात मोबाईल येऊन मुले मोबाईल गेममध्ये तासन्‌तास आपला वेळ वाया घालवून शरीराची हानी करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शरीर सदृढ व्हावे व त्यांना पारांपरिक खेळांचे महत्त्व समजावे या उद्देशाने ‘चला पारंपरिक खेळ खेळूया’ हा उपक्रम राबविण्यात आला.

मुख्याध्यापिका शोभना  यांच्या मार्गदर्शनाखाली यात सहभाग घेतला. लंगडी, विटी दांडू, लगोरी, कबड्डी, ठिकरीचा खेळ, मामाचे पत्र, पकडा पकडी, आंधळी कोशांबिर, लपंडाव, फुगडी आदी खेळांचा आनंद मोठ्या उत्साहाने घेतला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page