Thursday, April 30, 2026
Homeवणी2 हेक्टर वरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लाभ द्या

2 हेक्टर वरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लाभ द्या

•विजय पिदुरकर यांनी एस.डी.ओ. मार्फत मुख्यमंत्र्यांना घातले साकडे

अजय कंडेवार , वणी:- महापुर व अतीवृष्टीमुळे जमिन खरडुन नुकसान झालेल्या ता. वणी जि. यवतमाळ येथील २ हेक्टर वरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लाभ नायगांव येथील नुकसान ग्रस्त शेतकरी यांना देण्यात यावा याकरिता 21 ऑक्टोबरला विजय पिदुरकर व नायगावातील अल्पभूधाक शेतकरी यांनी वणी एस.डी.ओ. मार्फत मुख्यमंत्री यांना साकडे घातले आहे.

खरीप हंगाम २०२२ मधील महापुराने ता. वणी जि. यवतमाळ (विदर्भ) येथील वर्धा, निर्गुडा, पैनगंगा नदी परीसरातील रांगणा, भुरकी, शेलु, झोला, कोना, सावर्ला, जुनाड, पिंपळगाव, उकणी, बेलोरा, नायगाव, सावंगी, पुनवट, कवडशी, चिंचोली, शिवणी, माधोली, जुगाद येथील शेती जुलै, ऑगष्ट, सप्टेंबर महिन्यात ४ वेळा झालेल्या महापुर व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जमिन खरवडून अंदाजे ५०० हेक्टर नुकसान झाले आहे. शासन निर्णय २०१५ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी २ हेक्टरच्या आतील यांनाच नुकसान देय आहे. त्यामुळे २ हे. वरील ३०० हेक्टर क्षेत्र मदतीपासून वंचित झाले. विदर्भामध्ये विशेष करुन अमरावती विभाग यवतमाळ जिल्हामध्ये मोठ्या प्रमाणात बहुभूधारक शेतकरी असून ते सर्व कोरडवाहु शेती करतात. अतिवृष्टी पुर नैसर्गीक आपत्तीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी मदत हे कल्याणकारी धोरण परंतु २ हेक्टरचे आत अटीमुळे २ हे. वरील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित रहात आहे. सोबतच जुन ते ऑक्टोबर वाढीव दराने मदत शासन निर्णय दि. २२/८/२०२२ मध्ये २ हेक्टर ची मर्यादा ३ हेक्टर पर्यंत वाढीव दराने करण्यात आली परंतु महापुरामुळे भर पडणे व जमिन खरड़ने याबाबत कुठलाही उल्लेख करण्यात आला नाही. परिणामी शेतकऱ्यांनी बँक व अन्य संस्थामधून कर्ज काढून पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्याने प्रचंड मेहनत परंतु नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थीक संकट वाढले. उपजाऊ जमिन वातारर्णातील अनेक घडामोडी नंतर हजारो वर्षांनी तयार होत असते. ती जमिनीच महापुरामुळे खरडून गेली शेतकरी हवालदिल झाला. मुलांचे शिक्षण, आरोग्य, विवाह, आजार, दैणदिन व्यवहार जो पिकाच्या भरोशावर होता त्याची आशा मावळली.

महापुराने खरवडलेली शेती, नुकासान झालेले पीके व रब्बी हंगामासाठी करावयाची शेती मशागत कशी करायची हा प्रश्न त्याचा समोर उभा आहे. पुढील भविष्य अंधारात ही बाब अतिशय गंभीर व वेदनादायी आहे. शासनाने २२ ऑगस्ट २०२२ रोजी यापुर्वीची २ हेक्टर मर्यादा ३ हेक्टर व हेक्टरी ६,८००/ वाढीव दर १३,६००/- प्रती हेक्टर संकटाच्यावेळी केल्याबद्दल शासनाचे अभीनंदन व कोटी कोटी आभारही केले आहे.नैसर्गीक प्रकोपामुळे बहुभुधारक यवतमाळ जिल्हातील २ हेक्टरच्या वरील शेतकऱ्यांना जमिन खरडुन जाणे, भर पडणे यासाठी ४ हेक्टर मर्यादे पर्यंत अविलंब शासन निर्णय काढुन नुकसानग्रस्त हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देतांना लक्ष्मण धर्माजी नवले,दिलीप आबाजी बोबडे श्रीहरी विगेना बोबडे, गजाजन बापुजी बोबडे , भारत बोबडे, हिमराज बोबडे, प्रभाकर बोबडे, बापुराव बोबडे, शंखनाथ डोंगे, प्रदीप नागपुरे, हे सर्व उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page