Ajay,Wani: वणी शहरातील ॲड. राहुल खारकर मित्रपरिवारातर्फे लाठी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. शिबिरात लाठीसह निवली, बेसा, भालर, मंदर परिसरातील १६२ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५१ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर दि. ९ ऑक्टोबर रोजी महात्मे हॉस्पिटल, नागपूर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रुग्णांच्या ये-जा, निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पोलिस पाटील संजीवनी खिरटकर, आशा सेविका सुनीता डवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य रीना लाडे, मुकेश खिरटकर, रितेश लाडे, शुभम टोंगे, आशिष माहूरे, नंदू माहूरे, नीलेश करडे, गणेश माहूरे, सागर मोते, ईश्वर माहूरे यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले. आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित नागरिकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

