Ajay,वणी:- मागील 3 वर्षाआधीच बहुचर्चित बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील तब्बल 242 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सकाळपासून यवतमाळ जिल्ह्यासह वणीत एका औषधी विक्रेता यांचा घरी छापेमारी करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तीही बाब अद्यापही उघड झालेली नाही.
या प्रकरणात बँकेचे तत्कालीन संचालक, बँकेचे अधिकारी, व्हॅल्युवर तसेच बँकेकडून कर्ज घेतलेल्या कर्जदारांच्या निवासस्थानीही ईडीच्या पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यासह वणी शहर अशा 7 ठिकाणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.गुरुवारी सकाळी सुमारे 6 वाजतापासून ईडीचे अधिकारी वणी शहरात दाखल झाले. त्यानंतर संबंधित ठिकाणी पथकांनी धाडी टाकून कागदपत्रे व इतर कागदोपत्री पुराव्यांची तपासणी सुरु केली.या कारवाईमुळे वणी तालुक्यात जिल्ह्यात एकच खळबळ उडाली .
वणीच्या इतिहासात ईडीची ही पहिली मोठी शोधमोहीम…
वणीच्या इतिहासात ईडीची ही पहिली मोठी शोधमोहीम असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात असून, त्यामुळे या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, शोधमोहीम सुरू असताना ईडीकडून जप्ती, अटक किंवा तपासातील अंतिम निष्कर्षाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे कारवाईत नेमके काय हाती लागले, कोणत्या आर्थिक व्यवहारांची तपासणी झाली आणि पुढे कोणावर कारवाई होते, याकडे आता वणीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

