Wednesday, September 2, 2026
HomeUncategorizedवणी ठाण्यात लालपुलिया कोळसा व्यापाऱ्यांची बैठक....

वणी ठाण्यात लालपुलिया कोळसा व्यापाऱ्यांची बैठक….

Ajay,Wani:- लालपुलिया परिसरातील कोळसा प्लॉटधारक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, ढाबा चालक व अन्य व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर आमदार संजय देरकर यांच्या अध्यक्षतेखाली वणी पोलीस ठाण्यात 1 सप्टेंबर रोजी बैठक पार पडली. कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यावर साचणारी माती, धूळ, वाहतुकीला होणारा अडथळा आणि नागरिकांना होणारा त्रास यावर बैठकीत चर्चा झाली. रस्त्यावर साचलेली माती तातडीने साफ करण्यासह आवश्यक ठिकाणी ब्रेकर बसविण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या. कोळसा रस्त्यावर पडू नये व धुळीचा त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक ट्रकवर ताडपत्री व्यवस्थित बांधणे बंधनकारक असून, प्लॉटधारकांनी त्याची खात्री केल्यानंतरच ट्रक बाहेर सोडावा, तसेच संबंधित ट्रकची बिल्टी प्लॉटवरच देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले.

व्यवसाय करताना नियमांचे पालन झालेच पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रथम समज द्यावी; मात्र समज देऊनही वारंवार नियमभंग होत असल्यास नियमानुसार कारवाई करावी. कोळसा वाहतूक सुरू राहणे आवश्यक असले तरी त्याचा त्रास नागरिकांना होता कामा नये, असे आमदार संजय देरकर यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या तक्रारींकडे तातडीने लक्ष देऊन पोलीस प्रशासन, कोळसा प्लॉटधारक व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी, ठाणेदार भानुदास पिदुरकर, वाहतूक शाखा प्रमुख नरेश रणधीर, गणपत लेडांगे यांच्यासह काही शिवसैनिक, कोळसा प्लॉटधारक, ट्रान्सपोर्ट मालक, ढाबा चालक व अन्य व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page