Saturday, August 29, 2026
HomeUncategorizedवणी येथे ‘युवा साहिती’ कार्यक्रमाचे आयोजन.

वणी येथे ‘युवा साहिती’ कार्यक्रमाचे आयोजन.

Ajay kandewar,Wani: साहित्य अकादमी, नवी दिल्ली, शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा-वणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा साहिती’ या विशेष मराठी कविता-वाचन कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता लोकमान्य टिळक महाविद्यालयात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, वणीचे अध्यक्ष विजय मुकेवार राहणार असून, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे व विदर्भ साहित्य संघ, शाखा-वणीचे अध्यक्ष डॉ. अभिजित अणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. साहित्य अकादमी, नवी दिल्लीच्या सामान्य परिषदेचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे स्वागतपर मनोगत व्यक्त करतील.

या कार्यक्रमात पुनीत मातकर (यवतमाळ), मीनाक्षी गोरंटीवार (वणी), अविनाश पोइनकर (चंद्रपूर), गीता रायपुरे (चंद्रपूर) आणि दिलीप अलोणे (वणी) हे कवी आपल्या कवितांचे वाचन करणार आहेत. मराठी कवितेतील नव्या संवेदना, समकालीन आशय तसेच युवा कवींच्या सर्जनशील अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page