Thursday, August 27, 2026
HomeUncategorized‘त्या’ बीट जमादाराची ‘नू**र’साठी Super फिल्डिंग पण?

‘त्या’ बीट जमादाराची ‘नू**र’साठी Super फिल्डिंग पण?

Ajay,Wani : मुकुटबन परिसरातील कथित नू**र मटका व झेंडी-मुंडी व्यवसायावर झालेल्या थातूरमातूर कारवाईने आता वेगळेच प्रश्न उपस्थित केले आहेत. कारवाईचा कागद तयार झाला म्हणजे धंदा बंद झाला,असे समजण्याची घाई तर होत नाही ना?२४ ऑगस्टला कारवाई झाल्याचे सांगितले जाते; मात्र २५ ऑगस्टलाच कथित मटका पुन्हा सुरू असल्याचे पुरावे माध्यमांसमोर आल्याने मुकूटबन पोलिसांची पोलखोल झाली.

लाखोंचा कथित नू***र चा धंदा त्यात निव्वळ बीट जमादार यांनी आपली हुशारकी दाखवित 1 हजाराची जप्ती दाखवून मालकच गायब ?आणि एखाद्याला उचलून थातूरमातूर कारवाई वरिष्ठाना दाखविल्याची चर्चा सुरू आहे.त्याहून गंभीर प्रश्न म्हणजे २४ ऑगस्टची कारवाई आणि २५ ऑगस्टला पुन्हा सुरू झालेला कथित धंदा या दोन घटनांची सांगड घातली तर अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. जर कारवाई खरोखरच मटका-जुगाराच्या मुळावर करण्यात आली होती, तर दुसऱ्याच दिवशी तो धंदा कोणाचा इशाऱ्याने चालू केला होता. पोलिसांनी मोठा गाजावाजा करत कागदी रेकॉर्ड रंगवून कारवाई झाल्याचा फार्स दाखवण्यात आला ही तर मुकुटबन पोलिसांची पोलखोल दिसून आली ही तर शोकांतिकाच अशी जनतेतून

कथित‘नू**र’ला वाचविण्यासाठी बीट जमादार आणि  त्या ..गेंडूरगिटक्या ची हालचाल……

या कारवाईमध्ये बीटजमादाराचा कारवाईमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, सदर प्रकरणात मुख्य आरोपीला अटक तर सोडा त्याचे नाव देखील त्या कारवाईत घेण्यात आलेले नाही आणि एखाद्या माणसाला उचलून चिरीमिरी सारखे कारवाई दाखवून निव्वळ कागद रंगवण्याचे कार्य केलं आणि यामुळे मुकूटबन पोलिसांचे पितळ उघडे पडले अशी जनतेत चर्चा आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page