Ajay,Wani :- ईद- द- मिलाद व गणेशोत्सव या सणासुदीचा पार्श्वभूमीवर दि.२६ ऑगस्ट मंगळवार रोजी DYSP सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार P.I.भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वात वणी पोलिसांनी संपुर्ण शहर पिंजून काढीत “रुट मार्च” काढला.
वणी पोलीस ठाण्याच्या वतीने वणी शहरात दंगल नियंत्रण पथक 8 अधिकारी,60 कर्मचारी असा ताफासह सशस्त्र रुट मार्च करण्यात आला. आगामी सणानिमित्त पंचक्रोशीत कोठेही अनुचित प्रकार घडू नये, सण, उत्सव शासनाच्या नियमानुसार शांततेत साजरे व्हावे आणि समाजकंटकांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने वणी पोलिसांनी सशस्त्र संचलन करत शक्तीप्रदर्शन केले.
हा रूट मार्च शहरातील टिळक चौक-शहीद भगतसींग चौक -खाती चौक-सर्वोदय चौक-टागोर चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- गांधी चौक -साई मंदिर चौक या मार्गाने काढण्यात आला. यावेळी Dysp सुरेश दळवे,PI भानुदास पिदुरकर, वाहतूक शाखेचे PI रणधीर, API नागरे,प्रियंका चौधरी, PSI सुयोग महापुरे, साजिद शेख ,वडतकर , महानवर व समस्त वणी पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

