Thursday, August 13, 2026
HomeBreaking Newsबच्चू कडूंच्या कार्यप्रणालीने प्रेरित धीरज राजूरकर......

बच्चू कडूंच्या कार्यप्रणालीने प्रेरित धीरज राजूरकर……

Ajay,Wani:- तालुक्यातील मोहदा येथे शिवसेनेचे विदर्भ नेते तथा विधानपरिषद आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते शिवसेना शाखेचे थाटात उद्घाटन करण्यात आले. बच्चूभाऊ कडू यांच्या शेतकरी, दिव्यांग तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठीच्या संघर्षातून प्रेरणा घेत उपतालुका प्रमुख धीरज राजूरकर यांनी मोहद्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सुरू केली. विशेषतः कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांना ८० टक्के रोजगार मिळालाच पाहिजे, या भूमिकेसाठी बच्चूभाऊ कडू यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेने प्रभावित होऊन राजूरकर यांनी मोहद्यात या जनहिताच्या कामाला सुरुवात केली.

बच्चूभाऊंच्या विचारांनी प्रेरित होऊन मोहद्यात भगवा फडकविण्याची त्यांची अनेक दिवसांची इच्छा अखेर शाखेच्या उद्घाटनाने पूर्ण झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महिलांनी बच्चूभाऊंचे औक्षण करून स्वागत केले, तर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मोहदा येथील जिल्हा परिषद शाळेसाठी पाच लाख रुपयांचा आमदार निधी मंजूर करण्याची मागणी धीरज राजूरकर यांनी बच्चूभाऊ कडू यांच्याकडे केली. त्यावर बच्चूभाऊंनी पाच लाखांचा निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकरी, दिव्यांग, प्रकल्पबाधित आणि ग्रामस्थांच्या कोणत्याही प्रश्नासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी प्रकाश कुंडेकर, उपशाखाप्रमुख अविनाश ढुमणे, सचिव किशोर जोगी, सचिन ढुमणे, प्रवीण बोंडे, परीक्षित महाकुलकर, अरुण सोयाम, अरविंद खंडरे, सुरेश केळझरकर, रवी पूसाटे यांच्यासह समस्त शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page