Thursday, July 30, 2026
HomeBreakingवणीत अण्णाभाऊ साठे युवा विचार मंचचा वतीने भव्य अभिवादन सोहळा....

वणीत अण्णाभाऊ साठे युवा विचार मंचचा वतीने भव्य अभिवादन सोहळा….

Ajay,Wani : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा विचार मंच, वणी यांच्या वतीने शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता कल्याण मंडप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे जयंती अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याला अभिवादन करण्यात येणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजयभाऊ देरकर राहणार असून, उद्घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोधकुरवार यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून शिंदे गटाचे यवतमाळ जिल्हा संघटक विजयभाऊ चोरडिया आणि पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून संजय खाडे, विद्या आत्राम (नगराध्यक्ष), अनिकेत बदखल करुणा कांबळे, ऋतिक मामीडवार आणि नथ्युजी नगराळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा विचार मंच, वणी चे अध्यक्ष हिरेश पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शैलेश खडसे, महादेव जाधव, नरेश ससाणे, अमोल बावणे, सचिन ठोंबरे, सागर डोंगरे, रतन खडसे, अशोक पोटफोडे, सुरज चाटे, राकेश शंकावार आणि निलेश परगंटीवार हे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. आयोजकांनी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page