Saturday, July 11, 2026
HomeBreaking Newsवणीत स्व.गंगाधरजी बोर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बॅडमिंटन स्पर्धा ......

वणीत स्व.गंगाधरजी बोर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बॅडमिंटन स्पर्धा ……

Ajay,Wani : स्वर्गीय गंगाधरजी बोर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरात भव्य बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला १० जुलैपासून सुरुवात झाली असून सुमारे १५० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेत पाच गटांत सामने खेळविण्यात आले. विजेत्या खेळाडूंना एक लाख रुपयांहून अधिक रोख बक्षिसे, ट्रॉफी व प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष नरेंद्र बोर्डे, विद्यमान नगराध्यक्ष विद्या आत्राम, वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. गाडे, नगरसेवक लक्ष्मण उरकुडे, अजय धोबे, मनीष चौधरी व रमेश ठाकरे उपस्थित होते.

स्पर्धेचे पंच म्हणून चैतन्य बोर्डे, श्लोक अग्रवाल, ईश्वर सोनटक्के व जयेश उमके यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पवन ढवस बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गार्गी पिसे यांनी केले, तर सुहानी मुसळे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page