Ajay Kandewar,Wani:- शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला आता निर्णायक वळण मिळाले आहे. नगर परिषदेला आवश्यक असलेल्या पोलीस बंदोबस्ताला मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली असून, लवकरच नगर परिषद आणि वणी पोलीस प्रशासन संयुक्तपणे मोठी कारवाई सुरू करणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शहरातील सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून बसलेल्यामध्ये खळबळ उडाली आहे.

प्रशासनाने वारंवार सूचना आणि नोटिसा दिल्यानंतर अनेक गरीब व छोट्या व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवून सहकार्याची भूमिका घेतली. मात्र काही मुजोर अतिक्रमणधारकांनी अद्यापही प्रशासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केले असून, फुटपाथ आणि सार्वजनिक नाल्यांवरील अतिक्रमणे कायम ठेवली आहेत. यामुळे नागरिकांना ये-जा करताना तसेच पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, वणी पोलीस प्रशासन आता मोहिमेत सक्रिय सहभाग घेणार असून ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वात विशेष पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्यामुळे यापुढे केवळ सूचना नव्हे तर थेट कारवाईचा बडगा मोठ्या मासोळ्यावर उगारला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, नाले आणि फुटपाथ मोकळे करण्यासाठी एक दोन दिवसात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाण्यासाठी Green सिग्नल मिळालेलं आहे.

