Monday, June 8, 2026
HomeBreakingवणी ठाण्यात 'चाय विथ P.I',पत्रकारांशी थेट 'Connect'....

वणी ठाण्यात ‘चाय विथ P.I’,पत्रकारांशी थेट ‘Connect’….

Ajay Kandewar,Wani:- वणी पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी पदभार स्वीकारताच पत्रकारांशी सुसंवादाला प्राधान्य दिले आहे. याच अनुषंगाने सोमवारी (ता.8 जून) सायंकाळी पोलिस ठाण्याच्या पटांगणात “चाय पे चर्चा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, डिजिटल पोर्टल्स तसेच व्हिडिओ चॅनेल्सच्या प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार बांधवांच्या ओळख परेडीने झाली. त्यानंतर झालेल्या संवाद बैठकीत पोलीस-प्रशासन आणि माध्यमांमधील समन्वय, कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या तसेच माहितीच्या देवाणघेवाणीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. नव्या ठाणेदारांनी पत्रकारांना सहकार्याची ग्वाही देत, जनहिताच्या विषयांवर पोलिस आणि माध्यमे एकत्रितपणे काम करतील, असा विश्वास देखील बैठकीत व्यक्त करण्यात आले.

विशेष म्हणजे, पदभार स्वीकारल्यानंतर काहीच दिवसांत पत्रकारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधण्याचा पुढाकार घेतल्याने या कार्यक्रमाची शहरात पत्रकार आणि पोलिसांमध्ये अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहेत. चहापानाच्या माध्यमातून औपचारिकतेपेक्षा मैत्रीपूर्ण वातावरणात झालेल्या या बैठकीमुळे वणी पोलिस आणि पत्रकार यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची स्पष्ट भूमिका ठाणेदाराची यामधून दिसून येत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page