Saturday, June 6, 2026
HomeBreakingलाल टी-शर्टमधील कुजलेला 'तो' कोण?

लाल टी-शर्टमधील कुजलेला ‘तो’ कोण?

Ajay Kandewar,Wani:- मारेगाव तालुक्यातील मारडा धरण परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज असलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धरणालगतच्या नाल्यात हा मृतदेह आढळून आला असून, मृत व्यक्तीने अंगात लाल रंगाचा टी-शर्ट व राखडी (ग्रे) रंगाची पॅन्ट परिधान केलेली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याने या प्रकरणाभोवती अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. संबंधित व्यक्ती कोण होता? तो येथे कसा पोहोचला? त्याचा मृत्यू अपघाती आहे की घातपाताचा? मृत्यूच्या आधी तो कोणासोबत होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप गूढच आहेत.

दरम्यान, मृतदेहाची अवस्था पाहता मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात कोणताही संशयास्पद प्रकार नाकारता येत नसल्याने पोलिस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत. ठाणेदार वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस मृताची ओळख पटविण्यासह मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page