Thursday, June 4, 2026
HomeBreakingअजय धोबे यांना 'NOTA' ची आठवण आज आली.....

अजय धोबे यांना ‘NOTA’ ची आठवण आज आली…..

Ajay Kandewar,Wani : स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीमागील कारणांची चौकशी व्हावी, दबाव किंवा प्रलोभन झाले का याचा तपास व्हावा आणि मतदारांना NOTA(None of the Above)चा तरी अधिकार मिळावा, अशी मागणी करणारे नगरसेवक अजय धोबे यांचे निवेदन सध्या मनोरंजनात्मक ठरत आहे. निवेदनातील लोकशाही, पारदर्शकता आणि चौकशीची भाषा ऐकायला आकर्षक असली तरी नागरिकांच्या नजरा आता थेट धोबे यांच्या राजकीय भूतकाळाकडे वळल्या आहेत.

कारण, विधानसभा निवडणुकीवेळी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजय धोबे यांनी स्वतःच तो अर्ज माघारी घेतला होता. त्यावेळी कोणता दबाव होता, कोणती नाराजी होती, कोणता राजकीय हिशेब होता की अन्य काही कारण होते, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी स्वतः केली नव्हती. त्यामुळे आज दुसऱ्यांच्या निर्णयावर संशय व्यक्त करताना “तोच निकष स्वतःलाही लागू होतो का?” हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.राजकारणात उमेदवारी अर्ज भरणे आणि माघारी घेणे हा उमेदवाराचा कायदेशीर अधिकार आहे. पण जर प्रत्येक माघारीमागे संशय शोधायचाच असेल, तर तो नियम सर्वांसाठी सारखाच असायला हवा, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे धोबे यांच्या निवेदनापेक्षा त्यांच्या जुन्या राजकीय भूमिकेचीच अधिक चर्चा होत असून, “दुसऱ्यांच्या घरात दिवा घेऊन जाण्यापूर्वी स्वतःच्या अंगणातील अंधार पाहावा,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत आहे.

माघारीचा इतिहास विसरणे चुकीचे……

“लोकशाहीच्या नावाने चौकशीची तलवार दुसऱ्यांवर चालवताना स्वतःच्या माघारीचा इतिहास विसरणे म्हणजे राजकारणातील सोयीस्कर स्मृतिभ्रंशच म्हणावा लागेल. आज दुसऱ्यांच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या फॉर्म माघारीची कारणमीमांसा जनतेसमोर ठेवली, तरच ‘पारदर्शकते’चा उपदेश जनतेला खरा वाटेल; अन्यथा ‘हम करे सो फायदा… वरना कायदा’ हीच भावना अधिक बळावणार आहे.”

घरातील चुलीचा धूरही आता शेजाऱ्यांच्या अंगणातून...

गमतीची बाब म्हणजे उमेदवार महाविकास आघाडीचा, घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि संशयही महाविकास आघाडीवरच. म्हणजे स्वतःच्या घरातील चुलीचा धूरही आता शेजाऱ्यांच्या अंगणातून येतोय, असा दावा करण्याची वेळ आली आहे का? जर उमेदवार, प्रचार आणि राजकीय पाठबळ सगळं एकाच आघाडीचं असेल, तर आरोपांचं बोटही त्याच दिशेने जातंय, हेच या निवेदनातील सर्वात मोठं राजकीय कोडं ठरत आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page