Saturday, May 23, 2026
HomeBreakingराजूर PHC चे मुजोर फार्मसिस्ट, H.A आणि L.H.V.यांना मुख्यालयात राहण्यास "अँलर्जी "...

राजूर PHC चे मुजोर फार्मसिस्ट, H.A आणि L.H.V.यांना मुख्यालयात राहण्यास “अँलर्जी “…

Ajay Kandewar,Wani : प्राथमिक आरोग्य केंद्र राजूरमध्ये सध्या आरोग्य सेवा कमी आणि “मुख्यालयापासून पळापळ” जास्त सुरू असल्याची संतप्त चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगली आहे. गजानन ढोले (H.A.), एक महिला कर्मचारी (L.H.V.) आणि फार्मसिस्ट सुरज रालाबंडीवार हे तिन्ही कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याची माहिती समोर येताच आणखी नागरिकांचा संताप उफाळून आला. विशेषतः हे तीन कर्मचारी डॉक्टरांनाच ऐकत नसल्याची धक्कादाय माहिती समोर येत आहे.

गावकऱ्यांचा सवाल थेट आणि धारदार आहे,“शासनाचा पगार घ्यायला वेळेवर हजर… पण सेवेसाठी मुख्यालयात राहायला एवढी कशाची अडचण?”आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून गावकऱ्यांना अपेक्षा असते ती तत्पर सेवांची. मात्र राजूरमध्ये चित्र उलट असल्याचे बोलले जात आहे. मुख्यालयात राहणे ही शासनाची स्पष्ट अट असताना हे तिन्ही कर्मचारी मात्र जणू त्या नियमालाच केराची टोपली दाखवत असल्याची चर्चा आहे.या तीन मुजोर कर्मचाऱ्यांना “मुख्यालयात राहिलं तर अंगाला पुरळ उठते काय?”“की सरकारी नोकरी म्हणजे घरबसल्या पगार घेण्याचं केंद्र समजलं आहे?”गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सामान्य नागरिकांना एखाद्या दाखल्यासाठी किंवा औषधासाठी तासन्तास वाट पाहावी लागते; मात्र संबंधित कर्मचारी मुख्यालयात मिळणे म्हणजे नशिबाचा भाग झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, राजूर PHC आधीच विविध वादांमुळे चर्चेत असताना आता या “मुजोर तिकडी”मुळे प्रशासनाची आणखी बदनामी होत असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे की,“जनतेच्या पैशावर मजा आणि सेवेला मात्र कायम दांडी,”असा प्रकार किती दिवस चालणार?

स्थानिक नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे की, या प्रकरणात वेळेत कठोर भूमिका घेतली नाही तर जनआक्रोश तीव्र होऊ शकतो.आता सर्वांचे लक्ष एकाच प्रश्नाकडे लागले आहे की,राजूर PHC मधील या ‘मुख्यालय अलर्जी’ग्रस्त कर्मचाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार की नेहमीप्रमाणे फक्त कागदी चौकशीच होणार?  पुन्हा एक प्रकार समोर येणे म्हणजे अगदी आरोग्यवस्थेला प्रश्नच निर्माण झालेला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page