Saturday, May 9, 2026
HomeBreakingआळशी डॉ. राहुल चिखलीकर, कामचुकार डॉ. तेजस आस्वले चर्चेत.....?

आळशी डॉ. राहुल चिखलीकर, कामचुकार डॉ. तेजस आस्वले चर्चेत…..?

Ajay kandewar,Wani :- तालुक्यातील राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील बोगस कारभार,नियमित वेळेत डॉक्टर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी, रुग्णांची होत असलेली हेळसांड, कर्मचाऱ्यांचा विस्कळीत कारभार आणि सुविधांचा अभाव यामुळे PHC चा संपूर्ण कारभार “सलाईनवर” गेल्यासारखा असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली. विशेषतः डॉक्टर राहुल चिखलीकर यांच्याबाबत “आळशी डॉक्टर” अशी चर्चा गावागावात सुरू असून, डॉक्टर तेजस अस्वले यांच्यावर “कामचुकार डॉक्टर” असा थेट आरोप ग्रामस्थांकडून ऐकावयास येत आहे.

राजूर गावात आता “कर्मचारी बनला डॉक्टर आणि डॉक्टर बनले कामचुकार” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनेकदा रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधा अपुऱ्या असून, अनेकदा रुग्णांना खासगी दवाखान्याचा पर्याय शोधावा लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. आरोग्य केंद्रातील अनियमितता आणि दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, या दोन्ही डॉक्टरांविरोधात गावामध्ये आता उघडपणे नाराजी व्यक्त केली जात असून, “या दोघांना राजूर PHC मधून हटवा” अशी मागणीही जोर धरू लागली आहे. कर्मचाऱ्यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र असल्याची चर्चा गावात रंगत आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणात स्थानिक तालुका आरोग्य अधिकारी (THO) आणि DHO नेमकी काय भूमिका घेतात यांच्यात “सेटल करतात की जाणे दो ” ची भूमिका दाखवितात याकडे आता संपूर्ण राजूर परिसराचे लक्ष लागले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page