Ajay Kandewar,Wani:- वणी शहराच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खमंग चुरस निर्माण करणारी मोठी घडामोड समोर आली आहे. समाजकार्यातून ओळख निर्माण केलेला एक सच्चा व निष्ठावान कार्यकर्ता उद्या अधिकृतपणे शिंदे गटाचा धनुष्यबाण हातात घेण्यास सज्ज झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
निवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत हा कार्यकर्ता कोणत्याही पक्षासाठी काम करताना नेहमी शंभर टक्के देणारा, परिश्रम आणि प्रामाणिकपणासाठी ओळखला जातो. त्यामुळे तो ज्या पक्षात जातो त्या पक्षाला मजबुती मिळते, अशी त्याची शहरात स्पष्ट ओळख आहे.
आता हा तडफदार आणि जमिनीवरचा कार्यकर्ता शिंदे गटात प्रवेश करत असल्याने वणी नगरपरिषद निवडणुकीच्या समीकरणात निर्णायक बदल होण्याच्या चिन्हे दिसत आहेत. शिंदे गटाच्या गोटात या प्रवेशामुळे उत्साहात वाढ तर विरोधकांमध्ये गणितं बदलण्याची धांदल सुरू झाली आहे.उद्या होणाऱ्या या अधिकृत प्रवेशाकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, या हालचालीमुळे निवडणुकीचा रोख आणखी रंगतदार बनला आहे.

