Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsभाजप पुन्हा "त्या "आरोपांचा गचक्यात......

भाजप पुन्हा “त्या “आरोपांचा गचक्यात……

•भाजप पूर्णपणे ‘वन साईड पडत चालली? •यंदा तरी त्या "बायांना " रोजी मिळणार का? अशी शहरात चर्चा.

वणी : विधानसभेच्या निवडणुकीत ओबीसी मतदारांनी दूर ढकलल्याचा फटका बसल्यानंतर आता नगरपरिषद निवडणुकीतही भाजपची चिंता वाढलेली दिसत आहे. शहरात भाजपविरोधी वातावरण गडद होत चालले असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत.

शहरात सध्या “”कुणबी फॅक्टर” पुन्हा एकत्र येऊन भाजपविरोधात उभा राहतोय” अशी मोठी राजकीय हलचल पहायला मिळत आहे. मागील निवडणुकीत भाजपला मिळालेला फटका अजूनही ताजा असतानाच,”ओबीसी” समाजात नाराजीचे ढग पुन्हा एकदा गडद झाल्याचे जाणवत आहे.दरम्यान, भाजपच्या एका स्थानिक नेत्याने ओबीसी समाजाबद्दल केलेल्या कथित शिवीगाळ प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपचे वातावरण आणखीच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) गटाचा अधिकृत उमेदवार “सौ.मायाताई डुकरे ” यांना केलेला कथित फोन कॉल, त्यातील बोलण्याचा स्वर … हे भाजपसाठी प्रचंड नुकसानकारक ठरत असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत.

मागील विधानसभेत अनेक बायका त्या पक्षाच्या रॅलीत गेल्या होत्या परंतु त्या पक्षांचे वरिष्ठानि लक्ष न देता “त्या बायांना” रोज न दिल्याचे चर्चा व शहरात सुरू आहे”

राजकीय पातळीवर भाजपची प्रतिमा धुळीस मिळवणाऱ्या या घटनांमुळे वणी शहरातील मतदार आणखी दुरावण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. “भाजप एकीकडे, आणि सर्व समाज दुसरीकडे” अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे वातावरण राजकीय दिग्गज मान्य करू लागले आहेत.सध्या वणी शहरात असा प्रश्न सर्वत्र चर्चेत “या वातावरणातही जनता नगरपरिषदेची सत्ता भाजपला देणार का?”भाजप पूर्णपणे ‘वन साईड पडत चालली’ असल्याच्या चर्चा शहरात जोर धरत आहेत. मतदार संतप्त, समाज बांधव एकत्र, आणि विरोधी पक्ष उत्साहित अशा स्थितीत आगामी नगरपरिषद निवडणूक भाजपसाठी कसोटीची ठरणार हे निश्चित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page