Ajay Kandewar,Wani : वणी तालुक्यातील एमआयडीसी नजीक भालर रोडवरील जी.एस. कंपनीच्या आवारात 15 ऑक्टो.दुपारी 12 चा दरम्यान एक मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. काही तासांच्या तपासानंतर मृतदेहाची ओळख मनोज वानखेडे (वय अंदाजे ३०, रा. नवीन वाघदरा, ता. वणी, जि. यवतमाळ) अशी पटली आहे.

माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी रात्री मनोज वानखेडे यांची मिसिंग तक्रार कुटुंबियां मार्फत वणी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 15 ऑक्टो . रोजी दुपारी 12 वाजताचा सुमारास जी.एस. कंपनीच्या बंद मिल परिसरातील पाण्याच्या डबक्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, घातपाताचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिकांमध्ये ही साधी दुर्घटना नसून, काहीतरी गंभीर घडले आहे अशा चर्चा सुरू आहेत.वणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला असून, मृत्यूचे नेमके कारण आणि प्रकरणामागील धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सदर प्रकरणातील सत्य काही तासांत उघड होण्याची शक्यता आहे. पुढील चौकशी वणी पोलिस करीत आहे.

