Wednesday, July 15, 2026
HomeBreaking Newsटिकाराम खाडेंची जिल्हा परिषदेसाठी सज्ज .....

टिकाराम खाडेंची जिल्हा परिषदेसाठी सज्ज …..

•नांदेपेरा- वेल्हाळा गटात दिज्गजांशी ‘काट्याची टक्कर’.

Ajay kandewar, वणी :- पंचायत समिती सदस्य टिकाराम मोतीराम खाडे हे पुन्हा एकदा राजकीय रणांगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. मागील पंचायत समिती निवडणुकीत बाजी मारल्यानंतर यंदा त्यांनी थेट जिल्हा परिषद सदस्यपदासाठी तयारीचा बिगुल वाजवला आहे. नांदेपेरा–वेल्हाळा (गट)हा जि.प. सर्कल मतदारसंघ सर्वसाधारण आरक्षणात खुला झाला असून, या पार्श्वभूमीवर खाडेंच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जि.प.सर्कलमध्ये एकूण 30,149 मतदार असून, त्यात

पं.स.नांदेपेरा : 15,196 मतदार पं.स.वेल्हाळा : 14,953 मतदार असे समीकरण आहे.

मागील पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे टिकाराम खाडे यांनी प्रबळ प्रतिस्पर्धी उमा पिदुरकर व संजय रामचंद्र खाडे यांना पराभूत करून आपली ताकद दाखवली होती. मात्र यंदा 2025 मध्ये आरक्षण हे सर्वसाधारण सोडत निघाल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत या सर्कल मधून राजकीय दिग्गजांसह अनेक पक्षांचे संभाव्य उमेदवार मैदानात उतरण्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या मतदारसंघात “काट्याची टक्कर” ठरणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले.आता त्यांच्या विरोधात कोण उतरतो आणि ही लढत कोणाच्या बाजूने झुकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.जिल्हा परिषद निवडणुकीच्या या रणधुमाळीत नांदेपेरा–वेल्हाळा सर्कल आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, टिकाराम खाडे पुन्हा ‘बाजी मारतात का?’ हा प्रश्न सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

टीकाराम खाडें यांचे म्हणणे “मी मैदानात उतरण्यास तयार आहे आणि जनतेचा विश्वास माझी खरी ताकद आहे” असा विश्वास व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page