Saturday, May 9, 2026
HomeBreaking Newsवणी तालुक्यात शिक्षकांचे विनोबा ॲप प्रशिक्षण ...

वणी तालुक्यात शिक्षकांचे विनोबा ॲप प्रशिक्षण …

Ajay Kandewar,Wani:- जिल्हा परिषद यवतमाळ आणि ओपन लिंक फाउंडेशन यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत सुरू झालेला “आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम” अर्थात विनोबा (बा) ॲप हा उपक्रम आता वणी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करत आहे.

शिक्षणामध्ये एकसमानता, गुणवत्तापूर्ण अध्यापन व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी प्रशासनाने राबविलेल्या या उपक्रमामुळे वाचन, लेखन, गणित, इंग्रजी या विषयांमध्ये मुलांची पकड अधिक भक्कम होण्याची अपेक्षा आहे. अभ्यासाची सवय आणि शिक्षण प्रक्रियेत सातत्य निर्माण करून ग्रामीण भागातील शिक्षण नव्या उंचीवर नेण्याची ताकद या उपक्रमात दडलेली आहे.वणी तालुक्यातील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, वणी येथे नुकतेच या ॲपचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये इयत्ता १ ते ८ वी (प्राथमिक) वर्गांसाठी १३ केंद्रांमधील ३४ शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

उद्घाटन सोहळ्यास विस्तार अधिकारी प्रकाश नगराळे, रमेश बोबडे, गणेश भोयर तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. प्रशिक्षणाचे मार्गदर्शन ओपन लिंक फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक निलेश नागपुरे व प्रशांत सुभाष पाटील यांनी केले.

 “विनोबा ॲप हा केवळ तांत्रिक साधन नाही, तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नवा अध्याय आहे. तालुक्यातील प्रत्येक शिक्षकाने या उपक्रमातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांच्या घडणीसाठी पुढाकार घ्यावा.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page