Ajay kandewar,Wani:- मनसे नेता राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या प्रहारात्मक भूमिकेने गावोगावच्या जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सतत पाठपुरावा करून लक्ष वेधणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) भूमिकेला आता तरुणाई मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देताना दिसत आहे. राजकारणातील आडपडदा, आश्वासनांचा पाऊस आणि प्रत्यक्षात शून्य कामगिरी या पार्श्वभूमीवर युवकांना मनसेची आक्रमक व ठाम भूमिका आपलीशी वाटू लागली आहे.

राजकीय पक्ष निवडणुकांच्या तोंडावरच जनतेच्या संपर्कात येतात, मात्र दैनंदिन प्रश्नांकडे त्यांच्या पद्धतीने फारसं लक्ष दिलं जात नाही, अशी नाराजी सर्वसामान्यांतून व्यक्त होताना दिसते. अशा परिस्थितीत मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रश्न मांडल्यामुळे युवकांचा विश्वास या पक्षावर वाढू लागला आहे. शहरातील पाणीटंचाई, बेरोजगारी, वीज दरवाढ, रस्त्यांची दुर्दशा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा भोंगळ कारभार – या प्रत्येक विषयावर युवकांना आपलं मत मांडण्यासाठी मनसेसारखा व्यासपीठ उपलब्ध होत असल्याची भावना अनेक ठिकाणी उमटली आहे.
“विकासाच्या गप्पा आणि जाहीरनाम्याच्या घोषणा पुरेशा नाहीत; जनतेच्या जगण्याशी थेट संबंधित प्रश्नांवर ठोस कृती हवी,” अशी धारणा समाजात दृढ होत असून त्याचा परिपाक म्हणून मनसेकडे युवकांचा कल वाढतोय. युवकांचा हा कल राजकीय समीकरणे बदलणारा ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. कारण, आजच्या तरुणाईचा ऊर्जायुक्त सहभाग केवळ निवडणुकीतच नव्हे तर सामाजिक व आंदोलनात्मक कृतीतही प्रभावी ठरत असल्याचे अनेक उदाहरणे मागील काळात दिसली आहेत.

