अजय कंडेवार, वणी – जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीच्या वतीने संपूर्ण देशात आझादी का महोत्सव या निमित्ताने १५ ऑगस्ट ला येथील पाण्याच्या टाकीजवळ शासकीय मैदानात सायंकाळी 6 ते 10 या कालावधीत ” सुप्रसिद्ध गायक दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते “हेमंत ब्रृजवाशी” भक्ती भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .

श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदाही मोठया उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात येणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले. त्यातच भव्य दिव्य कार्यक्रमाची सुरुवातच स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन संपूर्ण देशात आझादी का महोत्सव या निमित्ताने अनेकांचे सत्कार , स्वागत समारंभ तसेच देशभक्तीपर गीत व नृत्य घेण्यात येणार आहे.ऍड. कुणाल चोरडिया हे उच्च शिक्षित तसेच राजकीय क्षेत्रातील तडफदार युवक,सामाजिक भान जपणारे नेतृत्व म्हणून ते उदयास येत आहे.
विशेषता १५ ऑगस्ट ला घेण्यात येणारा हा कार्यक्रम जल्लोषात व भव्यदिव्य स्वरूपात संगीतमय पद्धतीने वणीत अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे. यामध्ये भक्ती गीत तसेच स्वातंत्र्य दिवसाच एक अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. भव्यदिव्य स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवांची आतुरता वणीकर नागरिकांना आहे.शहरात.. यावर्षी तरुणाईच्या हाती समितीची धुरा सांभाळताच वणीत जल्लोषाचे वातावरण ही तयार झाले आहे.या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते “हेमंत ब्रृजवाशी”या कलावंताच विशेष आकर्षण राहणार आहे .तेव्हा वणी विधानसभा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष ऍड कुणाल विजयकुमार चोरडिया व जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे सचिव उमेश पोद्दार यांनी केले आहे.
जय श्रीकृष्ण जन्माष्टमी महिला उत्सव समिती द्वारा आयोजित विविध कार्यक्रम…
🔵बुधवार, दि. १३ ऑगस्ट २०२५ अमृत भवन येथे
बाल कृष्ण दर्शन : दु. २.०० वा. •कृष्ण व महाभारतातील पात्र (फॅन्सी ड्रेस)वयोगट : वर्ष १ ते १० बाल कृष्ण दर्शन बक्षिसे : प्रथम बक्षिस 2100₹,व्दितीय बक्षिस 1100₹,तृतीय बक्षिस : 500 ₹.
▶ डेकोरेशन स्पर्धा :दु. ५.०० वा.१. कृष्ण झुला डेकोरेशन
▶ गेम्स स्पर्धा २. कृष्ण मटकी डेकोरेशन दु. ६.०० वा. १. १ मिनिट गेम्स
▶ गीत गायन स्पर्धा: भक्तीगीत, भजन २. हौजी स्पर्धा.
सायं. ७.०० वा.भक्तीगीत गायन स्पर्धा बक्षिसे प्रथम बक्षिस : 3100₹,व्दितीय बक्षिस 2100₹,तृतीय बक्षिस : 1100 ₹.▶ लकी लेडी, लकी चाईल्ड वयोगट : वर्ष ६ ते १०, ११ ते १८
🟢गुरुवार, दि. १४ ऑगस्ट २०२५ स्थळ : शास. पाण्याच्या टाकीचे मैदान, वणी दु. २.०० वा.
भव्य नृत्य स्पर्धा: (सोलो व ग्रुप )धार्मिक व देशभक्तीपर गीतावर आधारीत एकल नृत्य स्पर्धा बक्षिसे
वयोगट : ४ वर्ष ते ९ वर्ष (प्रथम बक्षिस 5100 ₹,व्दितीय बक्षिस 2100 ₹,प्रथम बक्षिस 11000 ₹.
वयोगट : १० वर्ष ते १८ वर्ष व्दितीय बक्षिस 5100 ₹.
ग्रुप डान्स(प्रथम बक्षिस 21000₹,व्दितीय बक्षिस 11000 ₹.,तृतीय बक्षिस 1100 ₹.तृतीय बक्षिस 2100 ₹.तृतीय बक्षिस 5100 ₹.
एकल नृत्य स्पर्धा बक्षिसे : वयोगट : ४ वर्ष ते ९ वर्ष प्रथम बक्षिस 5100 ₹,व्दितीय बक्षिस 2100 ₹,प्रथम बक्षिस 11000 ₹.वयोगट : १० वर्ष ते १८ वर्ष
व्दितीय बक्षिस 5100 ₹.ग्रुप डान्स प्रथम बक्षिस 21000₹.,व्दितीय बक्षिस 11000 ₹.तृतीय बक्षिस 1100 ₹.तृतीय बक्षिस 2100 ₹.तृतीय बक्षिस 5100 ₹.(डान्स प्रवेश फी : ४ ते ९ : ५० रु., १० ते १८- १०० रु., ग्रुप : २५०/-)
(अट: डान्स प्रवेश फी : ४ ते ९ : ५० रु., १० ते १८- १०० रु., ग्रुप : २५०/-)

