Wednesday, July 15, 2026
HomeBreaking Newsचोरच चोर चोहीकडे, गेले पोलिस कोणीकडे'......!

चोरच चोर चोहीकडे, गेले पोलिस कोणीकडे’……!

•वणी व ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले. •चोरीच्या या प्रकारांना रोखण्यात पोलिसांना अपयश.

अजय कंडेवार, वणी : शहर व ग्रामीण भागात चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दररोज कोठे ना कोठे तरी चोरीचे प्रकार उघडकीस येत आहेत. चोर येतात, बिनधास्त चोरी करतात आणि निघून जातात. पोलिसांचा तपासही सीसीटीव्हीच्या पुढे जात नाही. चोरट्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. त्यामुळे चोरी, घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. ‘चोरच चोर चोहीकडे, गेले पोलिस कोणीकडे’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. चोरीच्या या प्रकारांना रोखायचे असेल, तर पोलिसांसोबत नागरिकांनीही जागरूक राहण्याची गरज आहे.

विशेषतः शहरात आणि ग्रामीण भागात चोरीचे प्रकार उघडकीस येत आहेत. लाखो रुपयांचे दागिने चोरटे हातोहात लंपास करत आहेत. सध्या चोरटे धुमाकूळ घालत आहेत. या सर्व वसाहती नव्या आहेत. बंगले, अपार्टमेंट आदीमुळे कोण कोणाकडे लक्ष देत नाही. शेजारी कोण राहायला आहे, हेदेखील काही ठिकाणी माहीत नसते. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा चोरटे उठवत आहेत.दिवसभर पाळत ठेवायची. बंद घरे हेरायची आणि रात्री तेथे चोरी करायची, हा चोरट्यांचा नित्यक्रम झाला आहे. चोर येतात, चोरी करतात आणि बिनधास्त निघून जात आहेत. चोरीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस येतात. पंचनामा करतात. ठसे घेतात. सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतात आणि निघून जातात. पुढे त्याचे काय होते, याचा थांगपत्ता लागत नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या व्यतिरिक्त अशा तपासाला गतीच येत नाही. पूर्वी पोलिस चोरट्यांनी शोधून आणत होते. रेकॉर्डवरचे काही गुन्हेगार, चोरटे हे पोलिसांना माहीत होते. पोलिस त्यांच्यावर पाळत ठेवून असायचे. एखादी घटना, चोरी अथवा गुन्हा घडला की पोलिस त्यामागील गुन्हेगार शोधून काढत होते.आता काळ बदलला आहे. पोलिस आणि त्यांच्या खबर्‍यांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन यावरच तपासाचे अवलंबित्व राहिले आहे. परिणामी, चोर्‍याचे डिटेक्शन कमी होत आहे आणि चोरांचे धाडस वाढत चालले आहे. त्यामुळे चोर्‍या वाढत आहेत. गस्त घालणार्‍या पोलिसांचा दबदबा होता. पोलिस संशयितांना हेरून गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवत होते. आता हे सर्व प्रमाण कमी झाले आहे.चोर्‍यांचे प्रमाण वाढत असताना सुरक्षिततेची काळजी नीट घेतली जात नाही. मात्र नेमकी याबाबतीतच नागरिकांकडून हेळसांड होते. त्यामुळे चोरांचे फावत चालले असून चोर्‍या वाढत आहेत.

राजूर (कॉलरी) येथे चोरट्यांनी मारला डल्ला….

राजूर येथे चोरट्यांनी एका बंद घरातून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह 61 हजाराचा मुद्देमाल चोरला. फिर्यादी विजया याकुब पेरकावार (57) हिच्या पतीची तब्येत खराब असल्याने 28 जून पासून त्या नागपूर येथे नागपूर येथे उपचार सुरु आहे. दरम्यान काही दिवसांपासून घर बंद असल्याचे लक्षात घेऊन अज्ञात चोरट्यांनी बेडरूम मधील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व 5 हजार रुपये लंपास केले. पण यातही कोणताच पोलिसांना सुगावा लागला नाही.. शहरात अनेक घरफोडी झाले तरीही पोलिस पथकाना यातही अपयश आल्याचे चित्र आहे.

पोलिसांना गस्तीची गरज….

वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अनेक गावे येत आहेत. वरील गावाबरोबर टोकाच्या भागातील गावात या गावामध्ये देखील गस्तीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यामुळे वणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गस्त वाढविणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page