Wednesday, April 15, 2026
HomeBreaking Newsश्री.रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्थेचे २८५ प्रकरणे निकाली....

श्री.रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्थेचे २८५ प्रकरणे निकाली….

•'राष्ट्रीय लोक अदालत'ला उत्स्फूर्त प्रतिसाद. •४ कोटी २४ लाख ,१४ हजार रु.ची कर्ज वसुली.

Ajay Kandewar :- न्यायालयात प्रलंबित फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार 22 मार्च रोजी न्यायालय परिसरात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये श्री. रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्थेचे (जिल्हा-चंद्रपूर व यवतमाळ) असे एकूण २८५ प्रकरणे निकाली काढून ४ कोटी २४ लाख १३ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. या राष्ट्रीय लोक अदालतला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद ही मिळाला.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,यवतमाळ व चंद्रपूर यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार २२ मार्च रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय,राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यात सर्वात जास्त प्रकरण निकाली काढता यावे, याकरिता वेगवेगळे पॅनल गठित करण्यात आले. ज्यामध्ये तालुक्यातील न्यायधीशानी कामकाज बघितले.सदर लोकअदालतमध्ये श्री. रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्था आपसी निपटारा प्रकरणे काढण्यात अव्वल ठरली. कारण संस्थेचे अध्यक्ष देविदास काळे यांचा मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शाखेचे तब्बल २८५ प्रकरणे निकाली काढून चार कोटी २४ लाख,१३हजार रुपयांची वसुली केली. हा वसुली आकडा लोकअदालतील आकर्षक ठरला.श्री.रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्थे अंतर्गत दाखल प्रकरण राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली काढण्याकरिता अध्यक्ष देविदास काळे व शाखेचे संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांच्या नेतृत्वात सर्व व्यवस्थापक व समस्त कर्मचारीवर्ग हे देखील हजर होते.

सदर लोकअदालत व विशेष मोहीम यशस्वी होण्यास समस्त व्यवस्थापक व कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम घेतले. त्यासह वकील संघटनेचे अध्यक्ष व इतर मान्यवर वकीलांनी मोलाचे सहकार्य केले तसेच लोकअदालत यशस्वी होण्यास सहभाग दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page