वणी:- तालुक्यांतील राजूर येथील सुस्साट चालवित असलेल्या ऑटोतून पडून महिला मजुराचा जागीच मृत्यू झाला. दि.19 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 चा सुमारास हा अपघात झाला. या ऑटोने झालेला अपघातात रंजना प्रवेश जंगमवार असे मृत महिलेचे नाव आहे.ऑटो चालकाचा हलगर्जीपणाने झालेल्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यांतील राजूर (कॉलरी) येथील रंजना प्रवेश जंगमवार (अंदाजे 45) या रहिवासी होत्या. ही लालपुलिया येथील संगीता कोलडेपो मध्ये मजुरी करायची.नेहमीप्रमाणे त्या कोलडेपोमध्ये रविवारी कामाला गेल्या होत्या. सायंकाळीं गावी परत जाण्यासाठी ऑटो क्र.MH-29-AM-0013 या गाडीत बसल्या. दरम्यान सोनामाता मंदिराजवळ सदर ऑटोचालक rash ड्रायव्हर चा नावाने प्रसिद्ध असलेल्या रहेमत रहेमान शेख(48) चें सुस्साट ऑटोवरील नियंत्रण सुटले. चालकाने निष्काळजीपणे ब्रेक दाबला. त्यामुळे ऑटोत बसलेल्या रंजना खाली पडले आणि डोक्याला जबर मार बसताच जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली. त्यात आणखी काहीं रोजमजुरी करणारे काही महीला होत्या त्यांनाही जबर मार बसला. प्रकरणी आरोपी ऑटोचालक रहेमत रहेमान शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
“रहेमत रहेमान शेख” “Rash ड्रायव्हरचा” नावाने प्रसिद्ध….. वाचा 👇हेही…
“रहेमत रहेमान शेख हा एक ट्रक चालक होता. त्यानें त्या ट्रक चालवित असतानाही अनेक अपघात केल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्यानें ऑटो चालविणे सूरू केलें. ते ऑटोही सुस्साट चालवायचा जणू काहीं तो ड्रायव्हर नसून त्यात बसलेल्यासाठी “यमदूतच” बनला असावा अशी त्याची ड्रायव्हिंग होती.त्यातही त्याने 18 मार्च रोजी पळसोनी फाट्यावर झालेल्या त्याचाच ऑटोचा अपघाताने 1 महिलेचा जागीच मृत्यू व 6 जखमी महिल्या झाल्या होत्या. त्यात कसा बसा राजूर गावकऱ्यांनी त्याला वाचविले. आणि शेवटीं तो पुन्हा “काल ” बनून विना कागदपत्राने “Rash driving “ करीत पुन्हा एका निष्पाप घरातील कर्त्या महिलेचा जीव घेतला आणि तीन मुलांना पोरक केलं.” राजूर येथिल अनेक ऑटोचे कागदपत्र पळताळनी करणे गरजेचे आहे. कारण येत्या काळात आणखी काही बळी गेल्यास जबाबदार कोण? म्हणून पोलिसांची कारवाई होणे गरजेचे आहे.