Saturday, November 28, 2026
HomeBreaking8 दिवसांत कटलीबोरगावला पाणी पोहोचवा, निधीची चिंता करू नका.....

8 दिवसांत कटलीबोरगावला पाणी पोहोचवा, निधीची चिंता करू नका…..

Ajay,Wani : झरी तालुक्यातील कटलीबोरगावातील तीव्र पाणीटंचाईची समस्या ऐकताच आमदार संजय देरकर यांनी थेट गाव गाठत परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत पाणीप्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली. “आठ दिवसांच्या आत गावाचा पाणीप्रश्न मार्गी लागलाच पाहिजे. निधी कमी पडत असेल तर माझ्या आमदार निधीतून देतो; पण निधीचे कारण पुढे करून जनतेला पाण्यासाठी वणवण भटकायला लावू नका” अशा ठाम शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत त्यांनी प्रशासनाला कामाची आठ दिवसांची डेडलाईनच दिली. आमदारांचा हा स्पष्ट आणि आक्रमक पवित्रा पाहून उपस्थित अधिकाऱ्यांनाही कामाला लागण्याचे संकेत मिळाले.

यावेळी गौरव पंधरे, बाळू दुधकोहळे, मधुकरराव भोयर, बंडूभाऊ आडे, नामदेव कुडमथे, सतीश कोडापे, सागर कुडमथे, गुणवंत आत्राम, अतुल कुमरे,किरण कोडापे (पोलीस पाटील),चंदा आत्राम (सरपंच, हिवरा बु.), अनिल टेकाम (उपसरपंच), भीमराव टेकाम, भूसेवार साहेब, देवीदास अडपावार (ग्रामसेवक), अभियंता मिर्झा , महिंद्रा मेश्राम, इंद्रजीत मेश्राम यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. पाणी हा जनतेचा मूलभूत हक्क आहे, उपकार नाही, ही भूमिका घेत आमदार देरकर यांनी निधीची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page